आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जावली तालुक्यातील ११ रस्त्यांच्या सुधारणेसाठी २५ कोटी मंजूर
![]()
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाला निधी
भुईंज: महेंद्रआबा जाधवराव
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधीचा अक्षरशः वर्षाव करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जावली तालुक्यातील ११ रस्त्यांची सुधारणा, पूल आणि पोहोच रस्ते करण्यासाठी तब्ब्ल २५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते व पूल परीक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२३-२४ अंतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम या योजनेतून हा निधी उपलब्ध झाला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
जावली तालुक्यातील पाचगणी कुडाळ रस्ता (प्रजिमा- २५) कि.मी. ०/०० ते ५/२०० (भाग: पाचगणी ते काटवली) सुधारणा करणे यासाठी २ कोटी ६० लाख, सातारा, येवतेश्वर पेट्री घाटाईदेवी फाटा घाटाईदेवी मंदिर कास बामणोली गोगवे तापोळा महाबळेश्वर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग-२६ कि.मी ५५/६०० ते ५९/७०० (भाग-निपाणी ते जावळी तालुका हद्द) रूंदीकरणासह सुधारणा करणे यासाठी २ कोटी ७० लाख, मेढा (वेण्णा चौक) कुसुंबी सह्याद्रीनगर कोळघर फाटा अंधारी मुनावळे वाघळी शेंबडी बामणोली रस्ता (प्रजिमा-१५२) कि.मी ३२/३०० ते ४०/३०० (भाग:- शेंबडी ते बामणोली) ची सुधारणा करणेसाठी २ कोटी ५० लाख, पाचगणी कुडाळ रस्ता (प्रजिमा २५) कि.मी. १४/००० ते १७/५०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे, (भाग: आखाडे ते सोमर्डी) याकामासाठी २ कोटी ५० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
सातारा येवतेश्वर पेट्री घाटाईदेवी फाटा घाटाईदेवी मंदिर कास बामणोली गोगवे तापोळा महाबळेश्वर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग २६ कि.मी ३४/८३० ते ३७/८३० (भाग अंधारी ते फळणी) (३.७५ मी. चे ५.५० मी. ने) ची रूंदीकरणासह सुधारणा करणेसाठी २ कोटी ५० लाख, सातारा येवतेश्वर पेट्री घाटाईदेवी फाटा घाटाईदेवी मंदिर कास बामणोली गोगवे २८५.०० तापोळा महाबळेश्वर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग २६ कि.मी ४०/६९० ते ४४/७९० (भाग- बामणोली ते म्हावशी) (३.७५ मी. चे ५.५० मी. ने) रूंदीकरणासह सुधारणा करणेसाठी २ कोटी ८५ लाख रुपये निधी मिळाला आहे. प्रजिमा-२६ कास एकीव गाळदेव माचुतर रस्ता (प्रजिमा-१४८) कि. मी. ६/०० ते २८०,०० १/५०० ची रूंदीकरणासह सुधारणा करणे (३.७५ मी. चे ५.५० मी. ने) (भाग: सह्याद्रीनगर ते म्हाते मुरा) याकामासाठी २ कोटी ८० लाख, प्रजिमा-२६ कास एकीव गाळदेव माचुतर रस्ता (प्रजिमा-१४८) कि.मी. १३/००० ते १६/००० (३.७५ मी. चे ५.५० मी. ने) ची रूंदीकरणासह सुधारणा करणेसाठी २ कोटी ७५ लाख, मेढा (वेण्णा चौक) कुसुंबी सह्याद्रीनगर कोळघर फाटा अंधारी मुनावळे वाघळी शेंबडी बामणोली रस्ता (प्रजिमा-१५२) कि.मी ३८/३५० येथे लहान पुलाचे पोहोचमार्गसह बांधकाम करणेसाठी १ कोटी ३० लाख, पाचगणी कुडाळ रस्ता (प्रजिमा- २५) कि.मी. ५/३००, ५/४५०, ६/१००, ६/४५० व ६/६०० मध्ये मोऱ्यांचे बांधकाम करणे १ कोटी ५० लाख, सातारा येवतेश्वर पेट्री घाटाईदेवी फाटा घाटाईदेवी मंदिर कास बामणोली गोगवे तापोळा महाबळेश्वर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग २६ कि.मी. ४७/८३० (तेटली गावाजवळ) लहान पुलाचे पाहोचमार्गसह बांधकाम करणेसाठी १ कोटी रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे.
तातडीने निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून मंजूर कामे त्वरित चालू करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी बांधकाम विभागाला केल्या आहेत.













