रत्नदीप भंडारे यांनी गेल्या चार वर्षात भुईंज पोलिस स्टेशनला केलेले काम हे कौतुकास्पद – सपोनि रमेश गर्जे
भुईंज / प्रतिनिधी : रत्नदीप भंडारे यांनी गेल्या चार वर्षात भुईंज पोलिस स्टेशनला केलेले काम हे कौतुकास्पद असुन कराडला सुध्दा त्यांचे हातुन चांगलेच काम होईल. रत्नदिप भंडारे यांची कामाची पद्धत चांगलीच आसुन ती आदर्शवत आहे. पुढे सुद्धा त्याचे हातुन चांगली कामे होतील व पोलिस खात्याचा ते नावलौकिक वाढवतील अशा शुभेच्छा माझ्या व पोलिस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतिने देतो. असे प्रतिपादन भुईंज पोलिस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांनी यावेळी केले.
दरम्यान भुईंज हे माझे पहीलेच पोलिस स्टेशन असुन चार वर्षात महालक्ष्मीच्या अशिर्वादाने खुप काही शिकलो असुन भुईंजकरांना कदापी विसरु शकत नसल्याचे पोलिस उपनिरिक्षक रत्नदिप भंडारे यांनी सांगितले.
भुईंज पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे हे भुईंज पोलिस स्टेशन मध्ये चार वर्षा कार्यकाल पुर्ण करुन कराड शहर येथे बदली झालेने त्यांचा निरोप समारंभ प्रसंगी भुईंज पोलिस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे बोलत होते. यावेळी पोलिस उपनिरिक्षक विशाल भंडारे, विजय अवघडे व भुईंज पोलीस स्टेशनचे सर्व पोलिस कर्मचारी हजर होते.
यावेळी बोलताना भुईंज प्रेस क्लबचे पत्रकार जयवंत पिसाळ म्हणाले की रत्नदिप या नावातच सर्व काही असुन त्यांनी भुईंज मध्ये चार वर्ष काम केले मात्र प्रत्येक गुन्ह्यात काम करताना चांगल्या प्रकारे काम करीत गोरगरिब जनतेला न्याय देण्याचे काम केले आसुन भुईंजच्या देवी महालक्ष्मी च्या अशिर्वादाने ते जिथे काम करतील तिथे गृह खात्याची उंची वाढवण्याचे काम करतील आशा शुभेच्छा सर्व पत्रकारांच्या वतिने पिसाळ यांनी दिल्या.
यावेळी विशाल भंडारे, विजय अवघडे, वैभव टकले, राजेश कांबळे, किशोर रोकडे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली
यावेळी रत्नदिप भंडारे यांचा भुईंज पोलिस स्टेशच्या वतिने सपोनि रमेश गर्जे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.













