Mon, Mar 2, 2026
आरोग्य प्रशासन

वाई पंचायत समितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर संपन्न

वाई पंचायत समितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर संपन्न
Ashok Ithape
  • PublishedMarch 14, 2024

स्पंदन हेल्थ केअर सेंटरच्या डॉ. महेश मेणबुदले यांचे लाभले विशेष सहकार्य

वाई / प्रतिनिधी- येथील नूतन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या संकल्पनेतून व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदिप यादव यांचे सहकार्यातून पंचायत समितीमध्ये शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी नुकतेच आरोग्य चिकित्सा शिबिर घेण्यात आले. स्पंदन हेल्थ केअर सेंटरचे डॉ. महेश मेणबुदले यांच्या विशेष सहकार्याने झालेल्या या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वाई पंचायत समितीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
दि. 13 मार्च रोजी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धन व चिकित्सेसाठी हे विशेष शिबिर घेण्यात आले.

या तपासणीमध्ये आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामिण पाणीपुरवठा विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामविकास अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करणेत आली.

या शिबीरामध्ये १२१ महिला व पुरुष कर्मचारी यांची रक्तदाब, मधुमेह, तसेच कान- नाक – घसा यांची तपासणी व जनरल तपासणी करणेत आली. तसेच सर्वच व्यक्तींच्या ईसीजीही काढण्यात आल्या.

हे शिबीर यशस्वी करणेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदिप यादव व तालुका आरोग्य कार्यालयातील प्रशांत माने, हरीदास घुले, अजित जगताप, आरोग्य पर्यवेक्षक नरेंद्र सणस, आरोग्य सहाय्यक राजकुमार वसंतराव शिंदे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, बाळू भोईर, विस्तार अधिकारी रुपेश मोरे, राहूल हजारे यांनी विशेष परीश्रम घेतले,

गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सहाय्यक गटविकास अधिकारी शांताराम गोळे, उपअभियंता संजय जाधव यांची यावेळी समायोजित भाषणे झाली. या सर्व मान्यवरांनी आरोग्य शिबीरे ही काळाची गरज आहे. सध्याच्या काळात ऑनलाईन काम तसेच सर्व कामाचा बोजा तसेच अनेक पदे रिक्त असलेने अतिरिक्त कामाचा बोजा कर्मचाऱ्यांवर पडत असलेने त्यांच्या शारीरिक क्षमतेवर दुष्परिणाम होत आहे, तसेच त्यांना स्वतःकडे बघण्यास वेळ मिळत नाही. यामुळे कर्मचारी यांची वर्षातून दोनदा शारीरीक तपासणी करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या भाषणात सांगितले.

या शिबीरात बीपी, शुगर हदयविकार कान नाक घसा या आजारानुसार फॉलोअप घेऊन नियमितपणे औषधोपचार घेऊन आपल्या तब्बेतीची काळजी व नियमितपणे डॉक्टरांच्या सल्यानुसार व्यायाम व औषधे घ्यावी. तसेच येत्या २१ तारखेला ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक व ग्रामपंचायतमधील इतर कर्मचारी यांची सुद्धा तपासणी करणेत येणार आहे. तसेच विविध विभागातील सर्व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करणेत येणार आहे.

डॉ. महेश मेणबुदले यांनीदेखील आपण नियोजित आरोग्य शिबीरासाठी उपलब्ध होऊ असे गटविकास अधिकारी यांना सांगितले. डॉ. मेणबुदले यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!