Mon, Mar 2, 2026
यशोगाथा

पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार

पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार
Ashok Ithape
  • PublishedMarch 6, 2024

भुईंज: महेंद्रआबा जाधवराव

शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार’ पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह गणपतराव जाधव यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी बुधवारी पुरस्काराची घोषणा केली.

शाल, श्रीफळ, व एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. लवकरच पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्काराचे यंदाचे नववे वर्ष आहे. यापूर्वी, शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी. एन. आर.राव, रयत शिक्षण संस्था, निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, प्रा. डॉ. शिवाजीराव श्रीपती कदम यांना प्रदान करण्यात आला आहे.

२०२४ चा पुरस्कार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर झाला. पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृति अशा विविध क्षेत्रासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!