Fri, Apr 17, 2026
यशोगाथा सातारा जिल्हा

देवेंद्र इथापे यांचा “सातारा उद्योगरत्न” पुरस्काराणे सन्मान

देवेंद्र इथापे यांचा “सातारा उद्योगरत्न” पुरस्काराणे सन्मान
Ashok Ithape
  • PublishedMarch 4, 2024

वाई l प्रतिनिधी:

देगाव येथील रहिवासी व श्री गणेश फीड्सचे मालक श्री. देवेंद्र इथापे यांना “सातारा उद्योगरत्न” पुरस्कार प्राप्त झाला असून त्याबद्दल देगांववासियांतर्फे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेतकरी परिवाराची पार्श्वभूमी असलेल्या देवेंद्र इथापे यांनी शैक्षणिक कारकिर्दीनंतर मोठ्या जिद्दीने श्री गणेश फीड्स या उद्योगाची उभारणी केली, तसेच आपल्या व्यवसायात विविध प्रयोगही राबवले. इतरत्र नोकरी न करता अन्य बेरोजगार व व्यावसायिकांची आर्थिक वृद्धी व्हावी, या हेतूने त्यांनी श्री गणेश फीड्सची पायाभरणी केली.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. नानाविध क्षेत्रातील वेगवेगळ्या गुणवत्तेसाठी एकूण ७० क्षेत्रासाठी संयोजकांतर्फे ॲवॉर्डस ठेवण्यात आले होती.

त्यात “बेस्ट कस्टमर सर्व्हिस”साठी 9 नॉमिनेशन्स आली होती. त्यामध्ये श्री. इथापे यांचाही समावेश होता. त्यातून वेगवेगळ्या भागातील पाच ग्राहकांच्या मुलाखती घेण्यात येवून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

त्यानुसार नुकत्याच झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री इथापे यांना प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!