Mon, Apr 20, 2026
आरोग्य सातारा जिल्हा

पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, याची दक्षता वैद्यकीय विभागाने घ्यावी असे आवाहन आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, याची दक्षता वैद्यकीय विभागाने घ्यावी असे आवाहन आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
Ashok Ithape
  • PublishedMarch 3, 2024

भुईंज: महेंद्रआबा जाधवराव

रविवार, ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जात असून या मोहिमेचा शुभारंभ सातारा येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी कस्तुरबा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.दीपक थोरात, गोडोली उप रुगणालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.रसिका गोखले तसेच वैद्यकीय कर्मचारी, ANM, DNM तसेच गांधी रुग्णालय व गोडोली उप रुग्णालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

वंचित बालकांना घरी जावून दिला जाणार डोज३ मार्च रोजी पोलिओ डोजपासून वंचित राहिलेल्या शहरी भागातील पाच वर्षाआतील बालकांना ४ ते ९ मार्च दरम्यान तसेच ग्रामीण भागातील बालकांना ४ ते ६ मार्च या कालावधीत घरोघरी जावून पोलिओ डोज पाजण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!