![]()
भुईंज येथील सना कन्स्ट्रक्शन चे मालक असलम निजाम मोमीन यांची कन्या सफा हिने किर्गिझस्तानमधील वैद्यकीय विद्यापीठातून संपादन केली डॉक्टर ऑफ मेडिसिन पदवी
भुईंज: महेंद्रआबा जाधवराव :
बांधकाम क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटविणा-या सना कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा अस्लम मोमीन यांची अत्यंत हुशार व स्वप्नांचा पाठलाग करणारी कन्या सफा हिने वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च पदविका मिळवण्याचे ध्येय ठेवले होते. मोमीन कुटुंबियांचे पाठबळ आणि जिद्दीच्या जोरावर सफाने परदेशी जावून तसेच अहोरात्र अभ्यास करुन मध्य आशियाई प्रदेशाच्या पूर्व सीमेवर असलेल्या किर्गिझस्तानमधील वैद्यकीय विद्यापीठातून डॉक्टर ऑफ मेडिसिन पदवी संपादन केली.
भुईंजची गुणवंत सुकन्या असलेल्या सफा हिचे दहावी पर्यंत तिरंगा इंग्लिश मेडियम स्कूल पाचवड व
अकरावी-बारावी किसनवीर महाविद्यालय वाई व स्वराज्य अकॅडमी धीरज सावंत सर या ठिकाणी शिक्षण घेतले. व पुढील उच्च शिक्षण आशियाई प्रदेशाच्या पूर्व सीमेवर असलेल्या किर्गीजस्तान येथे समर्पण आणि दृढ इच्छाशक्तीने सफाने तीचे व घरच्यांचे स्वप्न साकार केले.
किर्गिझस्तानमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाचा कालावधी इंटर्नशिपच्या एका वर्षासह सहा वर्षे आहे. हे NMC-मान्यताप्राप्त वैद्यकीय विद्यापीठांचे घर आहे जे भारतीय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत परवडणाऱ्या एमबीबीएस फीमध्ये उत्कृष्ट दर्जाचे वैद्यकीय शिक्षण देतात . शिवाय, किर्गिस्तानच्या वैद्यकीय विद्यापीठांनी जारी केलेल्या वैद्यकीय पदव्या भारत आणि जगातील इतर अनेक देशांमध्ये वैध आहेत.
किर्गिस्तानमध्ये एमबीबीएस
परवडणाऱ्या आणि गुणात्मक वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात एमबीबीएसचा अभ्यास करण्यासाठी किर्गिझस्तान हळूहळू सर्वाधिक मागणी असलेला देश बनत आहे. जागतिक दर्जाचे डॉक्टर बनण्याचे आणि देशाची सेवा करण्याचे सामान्य स्वप्न असलेले भारतीय विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये एमबीबीएसचा अभ्यास करण्याचा विचार करू शकतात . सध्या, किर्गिस्तानमध्ये दहा हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करत आहेत.













