Thu, Jun 4, 2026
Close

Recent Posts

स्थानिक बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा वेलंग येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

जि.प. प्राथमिक शाळा वेलंग येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न
Ashok Ithape
  • PublishedMarch 3, 2024

वाई l प्रतिनिधी:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलंग येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री नरसिंह हायस्कूल धोम येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राध्यापक मा.कृष्णा कांबळे यांनी संबोधित करताना, आपल्या भाषणात सांगितले, ग्रामीण भागातील विद्यार्थी आज जिल्हास्तरावर प्रावीण्य मिळवत आहेत, त्यासाठी पालकांनी आणि गावाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

यावेळी दरवर्षीप्रमाणे श्री काळभैरवनाथ सेवा तरुण विकास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष श्री रमेशदादा गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका सौ. कुलकर्णी मॅडम यांनी केले. मुख्याध्यापिका सौ.सपकाळ मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!