Thu, Jun 4, 2026
Close

Recent Posts

स्थानिक बातम्या

महिलांना व विद्यार्थ्यांना योग्यवेळी कायद्याचे ज्ञान आवश्यक – अ‍ॅड. राजवर्धीनी भोसले पाटील

महिलांना व विद्यार्थ्यांना योग्यवेळी कायद्याचे ज्ञान आवश्यक – अ‍ॅड. राजवर्धीनी भोसले पाटील
Ashok Ithape
  • PublishedMarch 3, 2024

भुईज l प्रतिनिधी:

महिलांना व विद्याथ्यांना योग्यवेळी कायद्याची माहिती जनजागृतीद्वारे मिळाली तर ख-या अर्थाने निकोप व विकसनशील समाज व्यवस्था निर्माण होऊन तंटामुक्त गावे घडतील. यासाठी वाडीवस्तीवर व गावनिहाय अशा प्रकारे कायद्याचे जनजागृती करणारे व्याख्याने झाली पाहिजेत असे प्रतिपादन अ‍ॅड. राजवर्धीनी भोसले पाटील वांनी पार्टेवाडी येथे वोलताना केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टेवाडी एकसर यांच्यावतीने काळभैरवनाथ यात्रा उत्सव निमित्त वार्षि क स्नेह संमेलन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून. अ‍ॅड. राजवर्धीनी भोसले पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सिने अभिनेत्री अश्विनी महांगडे, युवा नेते आनंद चिरगुटे, वाई पंचायत समितीचे उपसभापती पै. विकांत डोंगरे, युवा नेते स्वप्नील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वोलताना अ‍ॅड. राजवर्धीनी भोसले पाटील पुढे म्हणाल्या की आज घराघरातील महिला कुटंव व्यवस्था सांभाळत गावाचे गावपण राखत विकासाच्या वाटेवर स्वतः चालताना समाजाचा व गावाचा विचार करते म्हणूनच बचत गटासारखी चळवळ आज यशस्वी झाली. आपल्या मुलांवर संस्कार करताना तिला कायद्याचे ज्ञान मिळाले तर भविष्यातील पिढी नक्कीच सुसंस्कारीत घडू शकेल. यासाठी वाडीवस्तीवर गाव निहाय कायद्याचे ज्ञान देणारी व्याख्याने होणे गरजेचे आहे असे त्या यावेळी म्हणाल्या.

प्रारंभी जि.प. प्राथमिक शाळा पार्टेवाडी यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाविष्कार व नृत्य यांचे सादरीकरण झाले. उपस्थितांचे स्वागत शिक्षक व्यवस्थापन समिती ग्रामस्थ मंडळ एकसर पार्टेवाडी यांच्यावतीने करण्यात आले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!