Mon, Mar 2, 2026
नोकरी मार्गदर्शन

उंच भरारी योजने अंतर्गत युवांसाठी रोजगार मेळावा संपन्न

उंच भरारी योजने अंतर्गत युवांसाठी रोजगार मेळावा संपन्न
Ashok Ithape
  • PublishedFebruary 29, 2024

जिल्ह्यातील अनेक नामांकित कँपन्यांचा सहभाग

सातारा : 27 फेब्रुवारी –

सातारा जिल्हयातील सुशिक्षीत, बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्हयातील १८ ते ३५ या वयोगटातील युवक, युवती व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगर उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे.

आज दिनांक २७/०२/२०२४ रोजी सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत “पोलीस करमणुक केंद्र, अलंकार हॉल सातारा येथे रोजगार मेळावा २०२४ आयोजीत करण्यात आला होता. त्यामध्ये “टॅलेंटसेतु” या कंपनीमार्फत वाई, शिरवळ, सातारा, रांजणगाव, चाकण, तळेगाव, हैद्राबाद, गोवा तसेच महाराष्ट्रातील अनेक नामांकीत कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच चौगुले इंडस्ट्रीज, सातारा, अशोक लेलंड कंपनी, सातारा, भारत बेझ कंपनी सातारा, यामाहा शोरून सातारा, आय कॅन इनस्टीट्युट सातारा यांचे सातारा येथील कंपनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. सदर मेळाव्याकरीता सातारा जिल्हयातुन ४२७ युवक व युवती हजर होते. त्यावेळी हजर असलेल्या सर्व युवकांची नमुद कंपनीकडुन कागदत्रांची छाननी करुन घेण्यात आली. त्या वेळी श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी उपस्थित युवक व युवतींना मार्गदर्शन केले तसेच कंपनीमध्ये निवड झालेल्या युवक व युवतींना श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

सातारा जिल्हा पोलीस व टॅलेंटसेतु, चौगुले इंडस्ट्रीज, सातारा, अशोक लेलंड कंपनी, सातारा, भारत बेंझ कंपनी सातारा, यामाहा शोरूम सातारा, आय कॅन इनस्टीट्युट सातारा यांचे संयुक्त विद्यमानाने पुणे, सातारा, कोल्हापुर येथे युवक व युवतींचे त्यांचे शैक्षणीक निकषाप्रमाणे नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असुन काही युवक व युवतींना नियुक्ती पत्र देण्यात आलेले आहेत. सदर मेळाव्यात एकुण ४२७ युवक व यंवती हजर असुन त्यांना पुढील ७ दिवसांमध्ये नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.

उंच भरारी उपक्रमाअंतर्गत एकुण ६८३ युवक व युवतींना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त झालेला आहे. तसेच या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!