एकाच दिवसात २५ पेटंट घेऊन विश्वविक्रमी हॅटट्रिक, साताऱ्याचे सुपुत्र डॉ. प्रसन्नजीत प्रमोद निकम यांचा आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते सन्मान
भुईंज l महेंद्रआबा जाधवराव :
कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड येथील स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट व साताऱ्याचे सुपुत्र डॉ. प्रसन्नजीत प्रमोद निकम यांनी नुकतेच एका दिवसात २५ पेटंटस् फाइल करून एकाच वेळी तब्बल तीन विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा बहुमान पटकावला. सातारा-याच्या या विक्रमादित्य सुपुत्राचा शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्यावतीने आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गांधी मैदान राजवाडा सातारा येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी दै. पुण्यनगरीचे वृत संपादक विनोद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्रदादा चव्हाण, भाजपा विधान सभा अध्यक्ष अविनाश कदम, मा.नगरसेवक अमोल मोहिते, शेखर मोरे-पाटील राजु गोरे, प्रमोद निकम तसेच महोत्सव समितीचे कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ. प्रसन्नजीत निकम यांनी फिजिओथेरपी क्षेत्रातील आपल्या वर्षानुवर्षांच्या संशोधनातून तयार केलेले विविध २५ इनोव्हेटिव्ह उपकरणांची नोंद पेटंटच्या स्वरूपात केली. “इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस” आणि “वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया” मध्ये एका वेळी ३ विश्वविक्रम केला आहे.













