Mon, Mar 2, 2026
सामाजिक

आंबेगाव खुर्द – पुणे येथे शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

आंबेगाव खुर्द – पुणे येथे शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा उत्साहात संपन्न
Ashok Ithape
  • PublishedFebruary 20, 2024

श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे यशवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

पुणे / प्रतिनिधी :

आंबेगाव खुर्द – पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे तसेच विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विवा सरोवर जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द येथे शिवजयंतीचे औचित्य साधून निबंध, वक्तृत्व, चित्रकला, वेशभूषा व बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या सर्व स्पर्धांमध्ये परिसरातील विद्यार्थी व युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व स्पर्धा यशस्वी केल्या. तसेच शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 18 फेब्रुवारी रोजी सातारा येथील शिवबा प्रतिष्ठान संघ सातारा यांच्याकडून शिवकालीन ऐतिहासिक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून विविध मान्यवरांनी शिवरायांच्या जीवनकार्याविषयीची भाषणे केली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते आनंद जोशी तसेच बालकलाकार श्रीष खेडेकर, दर्श खेडेकर यांची सन्माननीय उपस्थिती होती.

या सर्व कलावंतांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले तसेच उत्कृष्ट संयोजनाबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. दरम्यान श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट पुणे यांच्याकडून गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह भेट देण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ. सोनिया रामचंद्र इथापे यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!