बावधन ता वाई येथील साहित्यिक डॉ जनार्दन पांडुरंग भोसले यांना २०२४ सालचा राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य पुरस्कार प्रदान
![]()
बावधन ता वाई येथील साहित्यिक डॉ जनार्दन पांडुरंग भोसले यांना २०२४ सालचा राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य पुरस्कार दुसरे मातंग ऋषी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभुणे आणि प्रमुख पाहुणे पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
भुईंज। महेंद्रआबा जाधव :
काळेवाडी ,चिंचवड येथील दुसरे मातंगऋषी साहित्य संमेलनात हा पुरस्कार दिला या वेळी मातंग साहित्य परिषद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष, साहित्यिक डॉ. धनंजय भिसे उपस्थित होते.
डॉ जनार्दन भोसले यांनी लिहिलेल्या “फ. म. शहाजिंदे यांच्या कवितेतील निधर्मीवाद ” या साहित्य कलाकृतीची सन २०२४ च्या राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाड्मय पुरस्कार उपस्थित साहित्यक,राजकीय मान्यवरांनी कौतुक केले.
साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शंकरशेठ जगताप खा. विनय सहस्त्रबुद्धे, खा. प्रदीप रावत, जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस, मुंबई येथील राज्य गुप्तचर कार्यलयाचे अधिकारी संतोष देसाई, कवी प्रा अशोक शिंदे, समरसता साहित्य परिषद पुणे चिंचवड शाखेचे पदाधिकारी तसेच कवी, साहित्यिक वाचक उपस्थित होते.













