निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा दि.13: लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. सातारा लोकसभा निवडणूकीची आत्तापर्यंतची पार्श्वभूमी पाहता शांततेत निवडणूका पार पडल्या आहेत. हीच परंपरा पुढे ठेवून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, नायब तहसीलदार अनिल जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक तहसील कार्यालयांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे परवाने घेण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा समक्ष अर्ज द्यावेत. जिल्ह्यातील संवेदनशिल मतदान केंद्रांवर जास्तीचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 50 टक्याकतहून अधिक मतदान केंद्रांवर वेब कास्टींची करण्यात येणार आहे. याशिवायही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यकता वाटल्यास त्यांनी मतदान सूचवावीत त्यांचेही वेब कास्टींग करण्यात येईल.
लोकसभा निवडणुकीसाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आचारसंहिता लागताच या पथकांकडून निवडणुकीच्या अनुषंगाने काजकाज सुरु होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत सांगितले.













