वाढत्या बालगुन्हेगारीला आळा बसावा याकरिता “घे भरारी” उपक्रम – पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी
![]()
वाढत्या बालगुन्हेगारीला आळा बसावा याकरिता “घे भरारी” उपक्रमांतर्गत पुनर्वसन आणि सुधारणा याबाबतची जबाबदारी सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी चांगली घेतली असल्याचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.
भुईंज। महेंद्रआबा जाधव :
सातारा पोलिस दलाची वार्षिक तपासणी करण्याबाबत सातारा येथे आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
कम्युनिटी पोलिस उपक्रमांतर्गत घे भरारी उपक्रम आहेत. यामध्ये १६ ते १९ वयोगटात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यासाठी अन इतर भरकटलेल्या बालकांचे पुनर्वसन करणे, उचीत शिक्षण देणे, पालकांसमवेत जोडून देणे, रोजगाराची संधी मिळवून देणे हे या योजनेचे उद्दीष्ट आता सातारा पोलिस अधिक्षक अन त्यांचे सहकारी चांगले प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या पाच सहा महिन्यात कमी आले आहे. पुनर्वसन आणि सुधारणा याबाबतची जबाबदारी सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी चांगली घेतली आहे.
सातारा शहरालगत असणाऱ्या एमआयडीसीत लहान मोठे चोऱ्या होवू लागल्या आहेत. त्याचा परिणाम उद्योगधंदे बाढीवर होत आहे. तेथील स्थानिकांचे मुलभूत प्रश्न सुटण्यात यावे, लोकांचा वेळ •अन पैसा वाचावा, यासाठी पोलिस ठाणे करण्याबाबत यापूर्वीच प्रस्ताव देण्यात आलेला आहे. तो यापुढे गतीमान करण्यात येईल, याचबरोबर जिल्ह्यातील अजून दोन तीन पोलिस ठाण्याबाबत डिव्हीजनचे प्रस्ताव पेंडीग आहेत, ते ही लवकरच मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.
एकंदरीत आयजीकडून जिल्ह्याचे पोलीस व्यवस्थापन कसे चालते, गुन्हे दाखल करणे, प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे, कायदा व सुव्यवस्था, व्हीआयपी सिक्युरीटी, कम्युनिटी पोलिसिंग, नागरिकांसोबतचे संवाद व वाहतूक व्यवस्थापन अन वेळोवेळी येणारे इतर प्रश्न याचा आढावा घेण्यात आला. सोशल मिडीयात घटना घडल्यानंतर कारवाई लगेच होणे अपेक्षीत आहे. यावर बोलताना फुलारी म्हणाले की, कोणतीही गोष्ट क्रिएट झाल्यानंतरच त्याचा उगम शोधता येवू शकतो. पण सोशल मिडीयातील घटना लगेच शोधून काढण्याबाबत अजून तंत्रज्ञान विकसीत झालेले नाही. सायबर पेट्रोलिंग अन सायबर सेल मात्र सोशल मिडीयावर लक्ष केंद्रीत ठेवून असते. डिजीटल जाळे आज व्यापक बनले आहे. त्यामुळे याबाबतचे गुन्हे उघडकीस होणारे डेव्हलप अजून विकसीत व्हायचे आहे. ते राष्ट्रीयस्तरावर काम चालू असते. निर्भया पथकाचे काम चांगले होण्यासाठी काय प्रयत्न करता येवू शकतील? यावर फुलारी म्हणाले, महाविद्यालयात आत मध्ये मुले सुरक्षित असतात. पण बाहेर निर्भया पथकाचे वेळापत्रकानुसार पोलिसांचे काम महत्वाचे आहे, असे फुलारी यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी उघडकीस आणण्याचा रेट हा ९२ टक्के झाला आहे. तो वाढण्यासाठी अजून प्रयत्न होतील. याबाबत सातारा पोलिसांना काही सूचनाही करण्यात आलेल्या आहेत.
-सुनील फुलारी, पोलीस महानिरीक्षक













