Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

विश्वविक्रमी हॅटट्रिक.. साताऱ्याचे सुपुत्र डॉ. प्रसन्नजीत प्रमोद निकम यांनी एकाच दिवसात २५ पेटंट घेऊन केले तीन विश्वविक्रम

विश्वविक्रमी हॅटट्रिक.. साताऱ्याचे सुपुत्र डॉ. प्रसन्नजीत प्रमोद निकम यांनी एकाच दिवसात २५ पेटंट घेऊन केले तीन विश्वविक्रम
Ashok Ithape
  • PublishedFebruary 5, 2024

भुईंज l महेंद्रआबा जाधव :

कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड येथील स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट व साताऱ्याचे सुपुत्र डॉ. प्रसन्नजीत प्रमोद निकम यांनी नुकतेच एका दिवसात २५ पेटंटस् फाइल करून एकाच वेळी तब्बल तीन विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा बहुमान पटकावला.

डाॅ. प्रसन्नजीत निकम यांनी फिजिओथेरपी क्षेत्रातील आपल्या वर्षानुवर्षांच्या संशोधनातून तयार केलेले विविध २५ इनोव्हेटिव्ह उपकरणांची नोंद पेटंटच्या स्वरूपात केली. “इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस” आणि “वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया” मध्ये एका वेळी ३ विश्वविक्रम केले.

या विश्वविक्रमाबद्दल डॉ. प्रसन्नजीत प्रमोद निकम यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांनी ह्याचे श्रेय त्यांचे वडील श्री. प्रमोद सुधाकर निकम, आई सौ. उल्हसिनी प्रमोद निकम, बहीण कु. मयुरी निकम, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश भोसले, डाॅ. विनयबाबा भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. दिनेश अगरवाल, फिजिओथेरपी कॉलेजचे डीन डॉ. जी. वरधराजूलू, डॉ. जयंत पवार, डॉ. ऐश्वर्या बुलबुले आणि समस्त कृष्णा विश्व विद्यापीठाच्या स्टाफला दिले आहे.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’ मध्ये एकाच वेळी तीन विश्वविक्रम केल्याबद्दल डाॅ. प्रसन्नजीत निकम यांचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्रदादा चव्हाण यांचेकडून आणि पुण्यशिल सुमित्राराजे नागरी सहकारी पतसंस्था, सातारा परिवार, जयेंद्रदादा मित्र समुह तसेच विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!