Mon, Mar 2, 2026
अध्यात्म सातारा जिल्हा

श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूह यांचेवतीने भव्य किर्तन व भजन महोत्सवाचे आयोजन

श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूह यांचेवतीने भव्य किर्तन व भजन महोत्सवाचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedJanuary 30, 2024

स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या २० व्या पुण्यस्मरणार्थ कल्याण पार्क मैदान, विलासपूर, सातारा येथे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूह यांचेवतीने दि.२ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत भव्य किर्तन व भजन महोत्सव आयोजन.

भुईंज। महेंद्रआबा जाधव : 

माजी मंत्री, विकासरत्न व सहकार महर्षी स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य किर्तन व भजन महोत्सव आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समुहाचे संस्थापक फिरोजभाई पठाण यांनी दिली.

भव्य किर्तन व भजन महोत्सवात शुक्रवार दि.०२/०२/२०२४ रोजी दु. ३:०० वा. महादेव भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम तसेच  दु. ४:०० वा. स्वरसंध्या भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा  कार्यक्रम तर सायं. ५:०० वा. ह.भ.प. नेहाताई साळेकर, पुणे यांचे किर्तन होणार आहे.

शनिवार दि. ०३/०२/२०२४ रोजी दु. ४:०० वा.पौर्णिमा भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार असून सायं. ५:०० वा. ह.भ.प. गोविंद महाराज गोरे, आळंदी यांचे किर्तन होणार आहे.

रविवार दि. ०४/०२/२०२४ रोजी दु. ४:०० वा. वैष्णवी भजनी मंडळाचा
सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार असून सायं. ५:०० वा. ह.भ.प. प्रविण महाराज शेलार विठ्ठलधाम, क्षेत्र आंबेघर यांचे किर्तन होणार आहे.

तरी या आध्यात्मिक महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!