Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

मराठा आरक्षण निर्णयाच्या योगदानाबद्दल आ. मकरंद पाटील यांचा सत्कार

मराठा आरक्षण निर्णयाच्या योगदानाबद्दल आ. मकरंद पाटील यांचा सत्कार
Ashok Ithape
  • PublishedJanuary 29, 2024

देगावमधील मान्यवरांनी व्यक्त केली कृतज्ञता     

सातारा / प्रतिनिधी :

मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला यश येऊन मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयासाठी विशेष प्रयत्न केल्याने वाई -खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जननायक मकरंदआबा पाटील यांचा देगाव येथील विविध मान्यवरांनी सत्कार करीत कृतज्ञता व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यसम्राट मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला.  मराठा समाजाच्या आरक्षणाचे नेते श्री. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून आरक्षणाचा शब्द पुर्णपणे पुरा करुन घेतला. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक व  राज्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेल्या वाई विधानसभा मतदारसंघाचे नेते जननायक कार्यसम्राट आ. मकरंद पाटील यांनी दिलेली साथ व मिळालेल्या मराठा आरक्षणाच्या अभूतपूर्व विजयानिमित्ताने देगाव पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी आ. पाटील यांची आनंदाची भेट घेतली.

सरपंच श्री. सूरज पिसाळ, उपसरपंच श्री. प्रकाशराव इथापे,  श्री. विजयराव इथापे, आ. मकरंद पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष माजी उपसरपंच श्री. योगेश इथापे आदी मान्यवरांनी आमदार मकरंद पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन मराठा आरक्षण प्रश्र्नी दिलेल्या योगदानाबद्दल व मराठा आरक्षणासाठीच्या विशेष पाठपुराव्याबद्दल सत्कार केला.

आमदार पाटील यांनीही या सत्काराबद्दल भारावून गेल्याचे मनोगत व्यक्त केले. तसेच देगाव पंचक्रोशीतील जनतेचे आपल्यावरील प्रेम आजवरच्या कारकिर्दीत तसेच पुढील वाटचालीसाठीही महत्त्वपूर्ण असल्याचे आवर्जून सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!