शेतात राबून मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, संजय राऊतांना शिवेंद्रसिंहराजेंचा टाेला
![]()
भुईंज। महेंद्रआबा जाधव
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा निघाल्या नंतर आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, मी पहिल्या पासून सांगत होतो हे सरकार मराठ्यांना आरक्षण देईल.
शिवेंद्रसिंहराजे पुढे बाेलताना म्हणाले यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिले होते पण उध्दव ठाकरे यांच्या काळात ते टिकल नाही.
यापूर्वीच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही अशी खंत व्यक्त करीत राजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो न्याय मिळवून दिल्याचे नमूद केले.
या लढ्याच्या यशाबद्दल राजेंनी मनाेज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करत खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले शेतात राबण्यात कोणता कमीपणा वाटताे राऊत यांना. मुख्यमंत्री हे शेतकरी कुटुंबातील आहेत. शेतात राबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवले. आता संजय राऊत यांनीनी मुखमंत्र्यांचे अभिनंदन करावे असेही राजेंनी म्हटले













