Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली मनसेतर्फे श्रीरामपूजन

शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली मनसेतर्फे श्रीरामपूजन
Ashok Ithape
  • PublishedJanuary 22, 2024

सातारा / प्रतिनिधी :

अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा शाखेतर्फे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. पंताचा गोट येथील मनसेच्या कार्यालयापासून शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक पावन हनुमान मंदिरापर्यंत रॅलीने आले तेथे ‘श्रीं’च्या मूर्तीची पूजा करण्यात आली. तसेच महाआरतीही करण्यात आली.

त्यानंतर कोल्हटकर आळी येथील काळाराम मंदिरात सर्व कार्यकर्ते गेले. तेथेही ‘श्रीं’च्या मूर्तीचे पूजन व महाआरती करण्यात आली. तेथून पुढे यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिरात सर्व महाराष्ट्रसैनिकांनी महाआरती केली.

या महाआरती व रॅलीमध्ये मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश दुर्गावळे, मनसे महिला सेना आघाडीच्या उपाध्यक्षा स्वातीताई शिंदे, शहराध्यक्ष वैशाली क्षीरसागर, जनाधिकार सेना शहराध्यक्ष संदीप सुंदळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष आनंदराव सणस, चित्रपट सेना जिल्हाध्यक्ष राजु पुजारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर उपाध्यक्ष भरत रावळ, अजहर शेख, प्रशांत सोडमिसे, शहर विभागाध्यक्ष गणेश पवार, संतोष सासवडकर, ओकार साळुंखे, कार्तिक रावळ, राघव चव्हाण, मनोहर चव्हाण, अमृत खंडाळे, इम्रान शेख, साईश पवार, आरूप पवार, प्रवीण डेंबरे, शिवाजी शिवराज नलवडे, अक्षय धुमाळ, सारवीन मोहिते, रिषभ पवार, ऋषिकेश सोनवणे, प्रसन्न शेलार, सोहम डूबल, चितम्बर टाकवटे, शाम फड़तरे आदी प्रमुख महाराष्ट्र सैनिक सहभागी झाले होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!