Mon, Mar 2, 2026
चालू घडामोडी

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत हेल्मेट सुरक्षा व नो-हॉर्न बाबत रॅलीचे आयोजन

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत हेल्मेट सुरक्षा व नो-हॉर्न बाबत रॅलीचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedJanuary 19, 2024

प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री. विनोद चव्हाण यांनी मोटार सायकल रॅलीस हिरवा झेंडा दाखवून हेल्मेट सुरक्षा रॅलीचा केला शुभारंभ.

भुईंज ।  महेंद्रआबा जाधव :

केंद्रशासनाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करणेकरिता संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन दि. 15.01.2024 ते 14.02.2024 या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांचे मार्फत केले जात आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा, पोलीस विभाग सातारा, महामार्ग पोलीस, वाहतूक शाखा सातारा व सातारा रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा तर्फे हेल्मेट वापराविषयी व नो हॉर्नबाबत जनजागृती होण्याकरिता हेल्मेट सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा चे अधिकारी/कर्मचारी, महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

सदर मोटर सायकल रॅली राजवाडा-सातारा नगरपालिका- पोवईनाका- अजंठा चौक-बॉम्बे रेस्टॉरंट चौक-वाढे फाटा-प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा या मार्गावरुन काढण्यात आली.

सदर मोटार सायकल रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शहर वाहतूक शाखा, सातारा, महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी, हेम ग्रुप, सातारा या कंपनीचे कर्मचारी, नंद इंटरप्रायजेस् रॉयल इनफील्डचे कर्मचारी, सातारा व कोरेगांव रायडर ग्रुपचे सदस्य तसेच ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विनोद चव्हाण यांनी दुचाकी चालविताना हेल्मेट वापरासंबंधी व नो हॉर्नबाबत उपस्थितांना प्रबोधन केले व मोटार सायकल रॅली सुरक्षितपणे राबविणेबाबत आवाहन केले. सदर रस्ता सुरक्षा अभियान यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करुन मोटार सायकल रॅलीची सांगता करण्यात आली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!