Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता योजना

पशुसखींनी शेळी व कुक्कुट पालन प्रशिक्षणाचा उपयोग स्वतःच्या उन्नती व पशुसेवेसाठी करावा – डॉ.अनिल भिकाने

पशुसखींनी शेळी व कुक्कुट पालन प्रशिक्षणाचा उपयोग स्वतःच्या उन्नती व पशुसेवेसाठी करावा – डॉ.अनिल भिकाने
Ashok Ithape
  • PublishedJanuary 18, 2024
जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथे ‘शेळी व कुक्कुट पालन सुधारणेसाठी पशुसखींचे कौशल्य विकास कार्यक्रम या प्रकल्पा अंतर्गत ‘शेळी व परसातील कुक्कुट पालन प्रशिक्षण’ या विषयावर दि.०३ जानेवारी २०२४ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत पहिले १५ दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षण समारोपाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.अनिल भिकाने यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना वरिल मत व्यक्त केले. पशुसखींनी प्रशिक्षणा दरम्यान या महाविद्यालयातील विविध विषयातील तज्ञ प्राध्यापकांनी व्याख्यान व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ स्वतःची आथिर्क उन्नती साधण्या सोबतच आपल्या परिसरातील पशुपालक व कुक्कुट पालन करणार्या व्यावसायिकांना सहकार्य करण्यासाठी करावा, असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.पऺचकोर उपस्थित दृकश्राव्य प्रणाली द्वारे उपस्थित होते त्यांनी पशुसखींनी यशस्वी उद्योजिका होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी या महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ.मुकुंद आमले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून  पशुसंवर्धन विभागाच्या स्मार्ट प्रकल्प समन्वयक डॉ.करगावकर मॅडम, डॉ. निलेश खलाटे, विद्यापीठाचे या प्रकल्पाचे समन्वयक डॉ.सारिपुत्त लांडगे व डॉ.गितांजली ढुमे दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, माहितीपुस्तिका व प्रथमोपचार पेटीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प सहसमन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. स्मिता कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसमन्वयक डॉ.आकाश डोईफोडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण सहसमन्वयक डॉ.तेजस शेंडे यांनी केले. सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण सहसमन्वयक  डॉ.विजयसिंह लोणकर, डॉ.मिलीऺद नांदे, डॉ.साईनाथ भोकरे प्रशिक्षण संयोजक समिती सदस्य डॉ.कविता खिल्लारे, तसेच डॉ.नामदेव लटपटे,श्री.नितीन कदम, सौ.सुशिला काळे व पदव्युत्तर विद्यार्थी विस्तार शिक्षण विभाग यांनी परिश्रम घेतले.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!