Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

रस्ते अपघात कमी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे – विनोद चव्हाण प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

रस्ते अपघात कमी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे – विनोद चव्हाण प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा
Ashok Ithape
  • PublishedJanuary 15, 2024

35 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान संपन्न

35 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024, डहाणूकर हॉल, सैनिक स्कूल, सातारा येथे दिनांक 15.01.2024 रोजी दुपारी 3.00 वाजता पार पाडला.

मा. श्री. समीर शेख, पोलीस अधिक्षक, सातारा, श्रीमती आचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक, सातारा, सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन (IN) के. श्रीनिवासन, मा. श्री. विनोद चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा व श्री. नागेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन सैनिक स्कूलचे विद्यार्थी, उपस्थित नागरिक इ. नी रस्ता सुरक्षा शपथ घेतली.

श्री. संदिप म्हेत्रे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करुन दि. 15.01.2024 ते 14.02.2024 या कालावधीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा मार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

श्री. अभिजित पिसाळ, डिलर असोसिएशनचे प्रतिनिधी व श्री. प्रशांत पोरे ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले.

श्री. विनोद चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करुन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणेबाबत आवाहन केले. त्यामध्ये विशेषतः प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मागील वर्षामध्ये राबविलेल्या अंमलबजावणीविषयी कामगिरीमुळे जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण 4% ने कमी झाले असल्याचे मान्यवरांना सांगितले.

सदर अभियानामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत उपस्थितीतांना माहिती देऊन रस्ते अपघात कमी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सैनिक स्कूलचे विद्यार्थी दशेतच नियमांचे अंगीकार करुन आपल्या कुटुंबातील सदस्यांचे जनजागृती करण्याची विद्यार्थ्यांना संधी असल्याचे सुचित केले.

श्री. नागेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपल्या मनोगतामध्ये रस्ता सुरक्षेचे नियम पालन करण्याबाबतची सुरवात विद्यार्थी दशेमध्ये होणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने परिवहन विभाग व पोलीस विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविणेबाबत विनंती केली.

सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन (IN) के. श्रीनिवासन यांनी आपल्या मनोगतामध्ये वाहन चालकांनी रस्ता सुरक्षेविषयी सर्व नियमांचे उदा. हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे, सीटबेल्टचा वापर करणे, वाहन चालविताना रस्ता वापरणाऱ्या इतर घटकांची सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच सर्व पालकांनी आपल्या पाल्याचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विधीग्राह्य अनुज्ञप्ती काढूनच वाहन रस्त्यावर चालविण्याचे आवाहन केले.

श्री. संग्राम देवणे, सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी आभार मानले. तसेच श्रीमती पूजा लोखंडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सूत्र संचालन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!