Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

स्थानिक बातम्या

गौरी भोसले यांचा, बावधन तंटामुक्त समिती च्या वतीने सत्कार

गौरी भोसले यांचा, बावधन तंटामुक्त समिती च्या वतीने सत्कार
Ashok Ithape
  • PublishedJanuary 3, 2024

बावधन l प्रतिनिधी :

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती बावधन यांच्यावतीने बावधन येथील कुमारी गौरी चंद्रकांत भोसले यांची मुंबई मंत्रालयात लिपिक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल गौरी भोसले यांचा सत्कार प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील तात्या कदम, माजी संचालक सयाजी बापू पिसाळ यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ पेढे भरून सत्कार करण्यात आला.

बावधन येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव बाळा भोसले यांची नात व चंद्रकांत नामदेव भोसले यांची कन्या गौरी चंद्रकांत भोसले हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षेत महाराष्ट्रात दुसऱ्या नंबर ने पास झाली तिच्या यशाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गौरी भोसले हिची मंत्रालयात वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती केली आहे.

गौरीच्या निवडीने बावधन गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला, मंत्रालयात संधी मिळणे फार भाग्याचे व बुद्धिमत्तेचे काम असते उच्चशिक्षित विद्यार्थ्यालाच अशा कामांची संधी मिळू शकते गौरी भोसले महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने पास झाल्यामुळे तिची निवड झाली आहे.

एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून वडील चंद्रकांत भोसले वीट भट्टीचा छोटासा व्यवसाय असून सुद्धा वडिलांनी मोठ्या कष्टाने व मेहनतीने गौरीच्या शिक्षणास प्रोत्साहन देऊन पाठबळ दिल्याने गौरी भोसले या यशापर्यंत पोहचल्या आहेत.

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनील तात्या कदम ज्येष्ठ पत्रकार दिलीप कांबळे बाजार समितीचे संचालक विवेक भोसले यांनी मनोगतातून गौरीचे कौतुक केले कार्यक्रमास प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, किसनवीर चे माजी संचालक सयाजी बापू पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर रासकर, पोलीस पाटील अश्विनी हावरे, तसेच तंटामुक्त समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!