Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र सामाजिक

“यांना जेवल्याशिवाय पाठवू नका, यांची राहायची व्यवस्था करा…” खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची ही कृती नक्कीच तुमचं मन जिंकेल !!

“यांना जेवल्याशिवाय पाठवू नका, यांची राहायची व्यवस्था करा…” खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची ही कृती नक्कीच तुमचं मन जिंकेल !!
Ashok Ithape
  • PublishedDecember 25, 2023

ही जी मुलं तुम्ही पाहत आहात ती आहेत, महाराष्ट्रभरातून पोलीस भरतीसाठी आलेली शेतकऱ्यांची मुलं.

महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ग्राउंड पेपर मध्ये वेटिंग लिस्ट वर असल्यामुळे व तांत्रिक अडचणीमुळे सेवेत रुजू न करून घेतल्यामुळे ही मुलं कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्याकरिता डोंबिवली येथील त्यांच्या निवास स्थानी रात्री ९ वाजता पोहचली, त्या ठिकाणी मुलांमध्ये व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात २० मिनिटं सकारात्मक चर्चा झाली, चर्चा भावनिक होती, काही तरुणींनी यावेळी रडत रडत आपली व्यथा मांडली, खासदारांनी त्यांना धीर दिला नंतर ते कुठे राहतात अशी चौकशी केली असता, कोणी सांगली, कोणी कोल्हापूर, बीड अश्या महाताष्ट्रातील काना कोपऱ्यातून हे तरुण तरुणी गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आलेले असून मिळेल तिथे फुटपाथ, दुकानांचे पॅसेज, नातेवाईक ह्यांच्या कडे राहत होती, आजच्या रात्रीची ह्यांच्या राहण्याची,जेवणाची आणि सकाळच्या नश्त्याची व्यवस्था करा व व्यवस्था झाल्यावर मला तसे रात्री कळवा, असे आदेश खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.

आदेशानुसार खासदारांचे खाजगी स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, राजेश कदम, जितेन पाटील, चंद्रकांत शेवळकर,लक्ष्मण मिसाळ आणि त्याची टिम,दुर्गेश मंडपे आणि सचिन काकडे ह्यांनी रात्री ११ वाजत त्वरीत आगरकर रोड येथील आदित्य मंगल कार्यालय येथे सर्व मुलांना राहण्याची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था केली, रात्री १२.३० वाजता खासदार शिंदे यांनी फोन वर त्यांच्या व्यवस्थेबाबत चौकशी करुन त्या तरुणांशी बोलणे केले, त्यांच्या शिष्टमंडळाला दुसऱ्या दिवशी मुंबई पोलीस आयुक्तांशी भेट घालून देण्याचे आश्वासन दिले, सकाळी लक्ष्मण मिसाळ ह्यांनी खासदारांच्या आदेशा नुसार सर्व मुलांची नाश्त्याची व्यवस्था केली व खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांसोबत स्वतः फोनवरून चर्चा करून मुलांचा विषय मार्गी काढावा असे सांगितले व आज मुंबईच्या पोलीस आयुक्त साहेबांसोबत मीटिंग अरेंज करून दिली हे सर्व काम बघून मुलांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद दिसत होता, एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात पुढील भविष्याची आशा अश्या स्थितीत सर्व मुला-मुलींनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खूप आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!