Mon, Mar 2, 2026
क्राईम न्यूज

चोरीचा छडा 24 तासात लावून गव्हाची व तांदळाची पोती हस्तगत महसूल व पोलीस प्रशासनाने सर्व स्तरातून अभिनंदन

चोरीचा छडा 24 तासात लावून गव्हाची व तांदळाची पोती हस्तगत महसूल व पोलीस प्रशासनाने सर्व स्तरातून अभिनंदन
Ashok Ithape
  • PublishedDecember 18, 2023

सातारा दि.18 (जिमाका) :

तहसिल सातारा यांचे नागठाणे येथील गोदामातून दि. 13 डिसेंबर 2023 चे मध्ये रात्री काही बोरट्यांनी खिडकीची लोखंडी जाळी कापून गोदामामध्ये प्रवेश करून प्रत्येकी 50 किलो वजनाची 6 गव्हाची व 1 तांदळाचे पोते चोरून नेले. गोदामपाल निलेश जाधव यांच्या सकाळी निदर्शनास येताच त्यांनी वरिष्ठ अधिकारी तहसिलदार राजेश जाधव व जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना कळविले. दोन्ही अधिकाऱ्यांनी नागठाणे गोदामामध्ये भेट देवून पाहणी केली. गोदामपाल यांनी बोरगांव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महसुल प्रशासनाने वेगाने हालचाली करत रात्रभर काम करून नागठाणे गोदामच्या लोखंडी जाळ्या रातोरात्र बदल्या तर पोलिस प्रशासनाने 24 तासात चोरीचा शोध लावत चोरीचा सर्व माल हस्तगत करत 6 जणांना ताब्यात घेतले.

महसुल आणि पोलिस प्रशासनाने अवघ्या एका रात्रीत गोडाउनची डागडुजी करणे व चोरीचा छडा लावून सर्व मुद्दे मालासह चोरांना पकडल्या वाचत समाजातील सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!