वाई एम.आय.डी.सी रस्त्यांसाठी २४ कोटी २० लाख मंजुर –आमदार मकरंद पाटील
वाई l प्रतिनिधी :-
वाई औद्योगिक क्षेत्रातील शेंदुरजणे फाटा ते एम.आय.डी.सी. पोहोच रस्ता व एम.आय.डी.सी. अंतर्गत रस्त्यांसाठी महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाकडून रुपये २४ कोटी २० लाख मंजुर झाले असल्याची माहीती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
वाई औद्योगिक क्षेत्रातील शेंदुरजणे फाटा ते एम.आय.डी.सी. पोहच रस्ता व अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले होते.त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये येणा-या वाहनांना व कामगारांना ये-जा करणे,तसेच परिसरातील गावातील स्थानिक लोकांना गैरसोयीचे होत होते. त्यामुळे हे रस्ते तातडीने दुरुस्त होणेकामी आ.पाटील यांनी महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाकडे व मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करुन २४ कोटी २० लाख निधी उपलब्ध करुन घेतला.
या रस्त्यांमुळे महाराष्ट्राचे कुलदैवत मांढरदेवी दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणा-या भाविकांनाही या रस्त्याचा उपयोग होणार आहे. या रस्त्यांमुळे औद्योगिक दळणवळण गतिमान होणार असल्याने जनतेमधून व कंपनी व्यवस्थाकपनांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.













