प्रांतपाल स्वाती हेरकळ यांच्या संकल्पनेतून, शेतकऱ्यांसाठी शेती अवजारांसाठी ग्लोबल ग्रँट.
वाई l प्रतिनिधी:
द रोटरी फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ , रोटरी डिस्ट्रिक्ट ६६५०,रोटरी क्लब ऑफ जॅक्सन टाउनशिप, रोटरी क्लब ऑफ नाईलस् आणि रोटरी क्लब ऑफ सालेम यांच्या सहकार्याने, परिवर्तन ग्राम मेणवली ,भोगाव, पांडेवाडी येथे मध्ये, शेतकऱ्यांसाठी शेतीची अवजारांच्या ग्लोबल ग्रँट लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात, दि.१० डिसेंबर 2023 रोजी पार पडला.
रोटरी प्रांत 3132 च्या प्रांतपाल स्वाती हेरकळ यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकारास आला आहे. शेतकरी बळीराजा आहे आणि त्यासाठी त्याला शेती करताना, आधुनिक तंत्रज्ञानाची आणि आधुनिकतेची जोड मिळणे हे गरजेचे आहे. मातीचा कस सुधारून, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे हा या मागचा हेतू आहे. चांगले उत्पन्न मिळून त्याला चांगला हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते. हे साध्य झालं तर आपण नक्कीच शेतकऱ्यांची आत्महत्या ही थांबू शकू. यासाठी आपण प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.यामुळे आपण आपलीच मदत करणार आहोत, कारण सेंद्रिय खत खतांवर तयार केलेले अन्न जर आपण घेतले तर बरेच आजार रोखू शकू.
मोठमोठे हॉस्पिटल मोठ्या आजारांसाठी उभे करण्यापेक्षा, हे आजार होऊच नयेत यासाठी चांगले अन्न निर्माण करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट गवर्नर स्वाती हेरकळ यांनी या सोहळ्यामध्ये मांडले. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही शेतीची अवजारांची बँक मेणवली विकास सेवा सोसायटी, मेणवली यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करणे हा या मागचा उद्देश आहे. त्यासाठी या तीनही परिवर्तन गावामध्ये,जवळपास १०२० गावकऱ्यांना घरच्या घरी सेंद्रिय खत निर्माण करता यावे म्हणून ड्रमचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये हे सर्व शेतकरी घरचा आणि शेतातील ओला कचरा टाकून सेंद्रिय खत निर्माण करून आपल्या शेतामध्ये वापरतील.
अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा मोठा प्रोजेक्ट मेणवली, भोगाव आणि पांडेवाडी येथे राबवण्यात येत आहे. त्यासाठी तीन ट्रॅक्टर, तीन ट्रॉलीज, तीन मळणी यंत्र, तीन बीबीएफ पेरणी यंत्र, 3000 लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर आणि 1020 ड्रम याचे वाटप याचा लोकार्पण सोहळा तीन गावांमध्ये करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ज्यांची सढळ हाताने मदत झाली अशा रोटरी डिस्ट्रिक्ट 6650 पी डी जी मीना पटेल (अमेरिका)आणि त्यांचे कुटुंबीय खास या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते.
तसेच प्रमुख उपस्थिती श्री अनिल कवडे सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य ,मुंबई हेही उपस्थित होते. त्यांनीही सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना आणि मेणवली विकास सहकार सेवा सोसायटी च्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि ग्रामस्थांना, सहकार खात्याच्या योजना सांगितल्या, त्या कशा राबवता येतील त्याचीही माहिती दिली. विकास सेवा सोसायटी ही गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर बँक असते आणि या त्रिस्तरीय पातळीवरील सहकार सोसायटी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना घेऊन आलेली आहे असेही त्यांनी सांगितले जे आपण बदल करणार आहोत ते शाश्वत बदल असावेत आणि ते मनापासून केलेले असावेत असेही त्यांनी नमूद केले. या रोटरी क्लबने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी रोटरी क्लब ऑफ वाईचे कौतुक केले.
या भव्य लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे पीडीजी मीना पटेल अमेरिका आणि त्यांचे कुटुंबीय, प्रकल्प समन्वयक डिस्ट्रिक्ट प्रांतपाल स्वाती हेरकळ, असिस्टंट गव्हर्नर डॉ. शंकर गोसावी प्रमुख उपस्थिती श्री अनिल कवडे सहाय्यक सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री प्रदीप बर्गे उपनिबंधक मुंबई, श्री अनिल शिरसागर सहाय्यक निबंधक वाई, परिवर्तन ग्राम प्रकल्प प्रमुख रो प्रमोद शिंदे वाई रोटरी क्लबचे अध्यक्ष रो डॉ प्रेरणा ढोबळे आणि सचिव रो संतोष निकम, श्री मधुकर चौधरी चेअरमन मेणवली विकास सेवा सोसायटी मेणवली हे उपस्थित होते.
तसेच डिस्ट्रिक्ट ३१३२ मधील, रो.रविंद्र बनकर अध्यक्ष लातूर मिडटाऊन , रो. धनश्री केळकर रोटरी क्लब ऑफ सोलापूर ,रो.रोहिणी पाठक रोटरी क्लब आंबेजोगाई सिटी आंबेजोगाई, रो. शशिकांत रसाळ अध्यक्ष रोटरी क्लब सातारा आणि सचिव रो. किशोर डांगे रोटरी क्लब सातारा तसेच रो. स्वप्निल परदेशी अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पाचगणी हे आवर्जून उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ वाईचे सर्व सभासद या भव्य सोहळ्यासाठी उपस्थित होते.
मेणवली विकास सेवा सोसायटी चे सर्व पदाधिकारी सभासद, मेणवली ,भोगाव ,पांडेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















