Mon, Mar 2, 2026
देश विदेश

नाद (करंजा) साठी 11 x एसीटीसीएम बार्ज प्रकल्पातील दारुगोळा आणि जलतीरासह क्षेपणास्त्र सुसज्ज (एसीटीसीएम ) तिसरा बार्ज, एलएसएएम 17 (यार्ड 127) 30 नोव्हेंबर 23 रोजी नौदल गोदी , मुंबई इथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द

नाद (करंजा) साठी 11 x एसीटीसीएम  बार्ज प्रकल्पातील  दारुगोळा आणि जलतीरासह क्षेपणास्त्र सुसज्ज  (एसीटीसीएम )  तिसरा  बार्ज, एलएसएएम 17 (यार्ड 127)  30 नोव्हेंबर 23 रोजी नौदल गोदी , मुंबई इथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द
Ashok Ithape
  • PublishedDecember 1, 2023

दारुगोळा आणि जलतीरासह क्षेपणास्त्र सुसज्ज  (एसीटीसीएम ) तिसरा बार्ज, एलएसएएम 17 (यार्ड 127)  30 नोव्हेंबर 23 रोजी  शंकर मुखर्जी, आयएनएएस , एजीएम, नाद  (कारंजा) यांच्या उपस्थितीत 30 नोव्हेंबर 23 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आला. या बार्जसाठी सर्व प्रमुख आणि सहाय्यक उपकरणे/प्रणाली स्वदेशी उत्पादकांकडून तयार करून घेण्यात आली असून हा बार्ज संरक्षण मंत्रालयाच्या “मेक इन इंडिया” उपक्रमाचा अभिमानास्पद ध्वजवाहक आहे.

भारत सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” उपक्रमाच्या अनुषंगाने 11 x दारुगोळा आणि जलतीरासह क्षेपणास्त्र सुसज्ज  (एसीटीसीएम) बार्जची बांधणी आणि वितरणाचा करार मेसर्स सूर्यदिप्ता प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे या एमएसएमईसोबत करण्यात आला होता. या एमएसएमई शिपयार्डने दोन बार्जेस यशस्वीरित्या सुपूर्द  केल्या आहेत. हे बार्ज इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगच्या  (आयआरएस) वर्गीकृत  नियमांनुसार बांधले जात आहेत. जेटींच्या बाजूने आणि बाह्य बंदरांवर भारतीय नौदलाच्या  जहाजांवर सामान/दारुगोळा चढवणे आणि उतरवणे सुलभ करण्यासाठी एसीटीसीएम बार्जेसची उपलब्धता भारतीय नौदलाच्या  परिचालन  वचनबद्धतेला चालना देईल.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!