विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत मेणवली येथे १७९१ लाभार्थ्यांचा सहभाग
वाई / प्रतिनिधी
विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत योजनांचे लाभ व त्याची माहिती लाभार्थ्यांपर्यंत गावोगावी पोहोचविण्याची गरज असल्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले.
मेणवली ता वाई येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत ग्रामस्थांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेटकरी बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी नारायण घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात तहसील कार्यालय,पंचायत समिती, ग्रामपंचायत, आरोग्य, पशु संवर्धन, कृषी आदी विभाग सहभागी झाले होते.
महसूल विभागाच्या वतीने तहसील कार्यालयाने रेशनिंग कार्ड,
पंचायत समितीच्या वतीने घरकुल योजना
कृषी विभागाने त्यांच्या योजना, आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य कार्ड आदी योजनांचे लाभ जागेवरच उपलब्ध केले होते.
या योजनेचा लाभ १७९१ लाभार्थ्यांनी घेतला.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या चित्ररथाव्दारे
लाभार्थ्यांना माहिती पोहोचविण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.





















