Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

उत्कर्ष पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सुरेल संध्येने सुरवात

उत्कर्ष पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सुरेल संध्येने सुरवात
Ashok Ithape
  • PublishedNovember 24, 2023

दर्जेदार कलाकार, रसिक प्रेक्षकांची गर्दी आणि उत्कर्ष पतसंस्थेचे उत्तम नियोजन याचा त्रिवेणी संगम कन्याशाळेच्या सत्यवती जोशी सभागृहात पाहायला मिळाला.

वाई l प्रतिनिधी : 

१९९९ साली स्थापन झालेल्या उत्कर्ष पतसंस्थेने यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले, त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या हिंदी जुन्या गाण्यांच्या सुरेल मैफिलीचा आनंद वाईतील असंख्य रसिक प्रेक्षकानी घेतला. या कार्यक्रमास वाईकरांनी हजेरी लावून उत्कर्ष पतसंस्थेला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या काही मान्यवर ज्येष्ठ सभासदांचा सन्मान करण्यात आला. ८० वर्षापेक्षा जास्त वय असलेले आणि तरीही उत्तम आरोग्य आणि जीवन शैली असलेले प्रभाकर जोशी, शरद अभ्यंकर, शिवराम जमदाडे, काशिनाथ चव्हाण, शंकर सुर्वे, शंकर त्र्यंबके, मारुती भिसे, काशिनाथ चव्हाण, मधुकर कल्याणकर, चंद्रकांत शहा यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. वाईकरांसाठी आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे वाईकरांनी भरभरून कौतुक केले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. रमेश यादव, संचालक श्री अमर कोल्हापुरे, श्री मदन साळवेकर, डॉ मंगला अहिवळे, श्री श्रीकांत शिंदे, श्री शरद चव्हाण, श्री सालीमभाई बागवान, श्री संजय कांबळे, श्री सागर मुळे, श्री वैभव फुले, श्री भूषण तारू, श्रीमती अलका घाडगे, मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार, टिळक ग्रंथालयाचे श्री अनिल जोशी, मार्गदर्शक श्री सुनील शिंदे तसेच इतर मान्यवर व उत्कर्ष पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!