Fri, Apr 17, 2026
कृषी वार्ता सहकार

‘किसन वीर’ने केली शेतकऱ्यांची दिवाळी गोड प्रमोद शिंदे ; २ कोटी ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

‘किसन वीर’ने केली शेतकऱ्यांची दिवाळी गोड प्रमोद शिंदे ; २ कोटी ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग
Ashok Ithape
  • PublishedNovember 10, 2023

दि. १०/११/२०२३ : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे मागील गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये गाळपाकरिता आलेल्या ऊसास रू.५०/- प्रति मेट्रिक टनाप्रमाणे २ कोटी ३० लाख २७ हजार ६६७ रूपये ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात वर्ग करण्यात आली असल्याची माहिती, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर व किसन वीर-खंडाळा हे दोन्ही कारखान्याचा गळीत हंगाम नुकताच सुरू झालेला असुन कारखान्याचे गाळप पुर्ण क्षमतेने सुरू आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्यावर संपुर्ण तोडणी यंत्रणा पोहोच झालेली असून ऊस तोडणीचा कार्यक्रम कारखान्याने दिलेल्या प्रोग्रामप्रमाणे सुरू आहे. किसन वीर कारखान्याने रू. २६५०/- प्रति मेट्रिक टन याप्रमाणे एफआरपीची रक्कम यापुर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेली आहे, त्यामध्ये रू. ५०/- प्रति मेट्रिक टन आणखी आदा केल्यामुळे किसन वीर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये रू. २७००/- प्रति मेट्रिक टन आदा करून एक विश्वास निर्माण केलेला आहे. किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी गळीत हंगाम शुभारंभाचे प्रसंगी दिलेला शब्द पाळुन सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड केलेली आहे. मागील हंगामात किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्याने कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता सर्वांची देणी दिल्यामुळे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार मजुर, व्यापारी इत्यादींमध्ये किसन वीर कारखाना गतवैभव प्राप्त करणार असल्याचा विश्वास निर्माण झाला असल्याचेही श्री. शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात दिले आहे.

तसेच चालू गळीत हंगाम २०२३ २४ मध्ये किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्याचा पहिला हप्ता २८०० रूपये जाहिर करण्यात आलेला असून, एफआरपी प्रमाणे जो दर निघेल तो देणार असल्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनीही कोणत्याही अमिषाला बळी न पडता आपला संपुर्ण ऊस किसन वीर व किसन वीर -खंडाळा कारखान्यालाच गाळपासाठी घालण्याचे आवाहन केलेले आहे. यानिमित्ताने सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्याना दिपावलीच्या सणाच्या शुभेच्छा चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने दिलेल्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!