Wed, Mar 4, 2026
आरोग्य

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा – मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा – मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी
Ashok Ithape
  • PublishedNovember 9, 2023

सातारा, दि. 9 :  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावी राबविण्याबरोबरच ज्या शाळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असेल अशा दुकानदारांवर गुन्हे नोंद करा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिल्या.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी श्री. खिलारी बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूच्या दूषपरिणामाबाबत जागृती करावी, अशा सूचना करुन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारे म्हणाले, जो दुकानदार 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विकताना दिसल्यास त्याच्यावरही कारवाई करावी. त्याचबरोबर शहरी भागासह ग्रामीणभागात भरारी पथकामाच्या माध्यमातून वेळोवेळी दुकांनाना भेटी द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहित जिल्ह्यात प्रभावी राबवा

कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहित 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही मोहिम जिलह्यात प्रभावी राबवावी, अशा सूचनाही श्री. खिलारी यांनी केल्या.

समाजातील निदान न झालेल्या कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणावेत व संगर्साची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करावा. त्याचबरोबर मोहिमेंतर्गत प्रशिक्षीत पथकाद्वारे गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे शोधावेत.

जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीचा आढावा घेताना श्री. खिलारी म्हणाले एचआयव्ही टेस्टींग किटची त्वरीत खरेदी करावे त्याचबरोबर औषधांसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेंतर्गत जी रुग्णालये आहेत त्यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा द्याव्यात. तसेच आयुष्यमान कार्ड देण्यासाठी रुग्णालयांमध्ये कक्षाची स्थापना करावी, अशा सूचनाही श्री. खिलारी यांनी शेवटी केल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!