सातारा जिल्ह्यात एक लाख 32 हजार 447 आनंदाचा शिधा वाटप
सातारा, दि. 9 : दिपावली सणानिमित्त सातारा जिल्ह्यात आनंदाचा शिधावाटप सुरु आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली असून आत्तापर्यंत 1 लाख 32 हजार 447 आनंदाचा शिधा संच वाटप झाले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.
वाटप करण्यात आलेल्या संचांची टक्केवारी 33.68 टक्के असून तालुकानिहाय वाटप पुढीलप्रमाणे आहे. खंडाळा 10 हजार 196, कोरेगाव 17 हजार 111, कराड 38 हजार 232, वाई 9 हजार 157, सातारा 22 हजार 567, फलटण 13 हजार 422, जावली 5 हजार 175, महाबळेश्वर 1 हजार 500, माण 5 हजार 124, खटाव 6 हजार 92, पाटण 3 हजार 178.
जिल्ह्यात अजून 2 लाख 60 हजार 795 आनंदाचा शिधा संच वाटप करण्यात येणार आहे. दिपावली पूर्वी हे वाटप पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाने नियोजन केले असल्याचेही श्रीमती राजमाने यांनी सांगितले.













