Tue, Apr 21, 2026
शिक्षण

सैन्यदलातील अधिकारी पदांच्या परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

सैन्यदलातील अधिकारी पदांच्या परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण
Ashok Ithape
  • PublishedNovember 9, 2023

सातारा दि. 9 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घ्येण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक व नवयुतींसाठी दि. 20 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (SSB) कोर्स आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ईमले आयडी training.pctcnashik@gmail.com दूरध्वनी क्र. 0253-2451032 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!