Tue, Apr 21, 2026
महाराष्ट्र

डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर

डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर
Ashok Ithape
  • PublishedOctober 31, 2023

दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते  इस्लामपूर येथे पुरस्कार वितरण

सामाजिक ,वैद्यकीय, शैक्षणिक , पत्रकारिता आदी क्षेत्रात गौरवास्पद काम करणा-या पाच व्यक्तींना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

त्यामध्ये  श्री.डॉ.दिलीप बजरंग मगदूम,श्री.बबनराव अवघडी रानगे ,श्री.विलासराव कोळेकर, श्री.इंजी.दत्तात्रय शामराव माने व सौ.अनुराधा प्रभाकर देशमुख हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
स्व. डॉ. बाबुराव घोडके (दादा) यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन रविवार दि. ०५ / ११ / २०२३ रोजी आहे. सामाजिक कामाची  विशेष दखल घेऊन डॉ. बाबुराव घोडके  फाऊंडेशनच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय ‘रयतधारा’ पुरस्कार २०२३ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच रयतधारा प्रेरणा पुरस्कार श्री.अंबाजी तुकाराम कोळेकर,डॉ. शंकरराव आनंदराव माने,श्री. राजाराम बापू वाठरकर,श्री.संपतराव आकाराम ठोंबरे,श्री.बिराप्पा सिद्दप्पा चिकबिरे यांना जाहीर करण्यात आला आहे.आपल्या समाजसेवेचा आदर्श इतरांनी घ्यावा व समाजामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी हा यामागचा उदात्त, उत्कट आणि उत्तुंग हेतू आहे.

रविवार, दि. ०५/११/२०२३ रोजी इस्लामपूर येथे सकाळी ९ वाजता पुरस्कार स्विकारण्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र भुषण  प्रा. डॉ. अरुण घोडके यांनी कळवले आहे. सदर  कार्यक्रम मातोश्री हॉल, दत्तटेकडी जवळ, कामेरी रोड, इस्लामपूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!