रयत शिक्षण संस्थेस केंब्रिज विद्यापीठाच्या शिष्टमंडळाची भेट.
रयत शिक्षण संस्था व केंब्रिज विद्यापीठाच्या शिष्टमंडळाची महत्वपूर्ण बैठक गुरुवार दि. २६ आक्टों. २०२३ रोजी झाली. या बैठकीस संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी IAS (Retd.), संस्थेचे संघटक मा.डॉ. अनिल पाटील, संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख IAS (Retd.),केंब्रिज विद्यापीठचे दक्षिण आशिया विभागाचे कार्यकारी संचालक अर्जुन राजामणी, केंब्रिज विद्यापीठाचे प्रादेशिक व्यवस्थापक व्ही.व्ही जोशुआ व इंग्रजी विभागाचे दक्षिण आशिया विभाग प्रमुख अमोल नाडकर्णी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये संस्थेच्या विद्यार्थांना केंब्रिज विद्यापीठाचे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासण्याची संधी उपलब्ध करणे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे, संस्थेच्या शिक्षकांना उच्चतम ज्ञान मिळवून देवून त्यांचे अंगभूत कौशल्य विकसन करणे, संस्थेत नवनवीन अभ्यासक्रम राबविणे तसेच संशोधनामध्ये परस्परांना सहयोग करून संशोधन व तंत्रज्ञान अभ्यासक्रम विकसन करण्याबाबत प्राथमिक स्तरावर सकारात्मक चर्चा झाली.
रयत शिक्षण संस्थेचा शैक्षणिक व प्रशासकीय पातळीवर काम करणारा अभ्यास संशोधन गट व केंब्रिज विद्यापीठाच्या गटाकडून पुढील कार्यक्रमाचा रोड मॅप लवकरच तयार करण्यात येणार आहे.













