Mon, Mar 2, 2026
अभिष्टचिंतन सामाजिक

‘किसन वीर’ वर आमदार मकरंदआबा पाटील यांच्या वाढदिनी मोफत महाआरोग्य शिबीर

‘किसन वीर’ वर आमदार मकरंदआबा पाटील यांच्या वाढदिनी मोफत महाआरोग्य शिबीर
Ashok Ithape
  • PublishedOctober 26, 2023

वाई / दि. २६ –

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार मकरंदआबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावर मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन रविवार (दि. २९) रोजी करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात श्री. शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, वाई-खंडाळा -महाबळेश्वर तालुक्यामध्ये विकासाचा डोंगर उभा करणारे, कायम कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणारे, सर्वांच्या अडी-अडचणीमध्ये सहभागी होणारे व शेतकरी सभासदांच्या भल्यासाठी आपली आमदारकी पणाला लावुन किसन वीर व खंडाळा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सतत कार्यमग्न असणारे जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किसन वीर कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी अवक काँग्रेस, मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व शेंद्रे, सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर, रक्तदान, मोफत मोतीबिंदू निदान शिबीर, नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप करणार असून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांसाठी मोफत उपचार मिळणार आहेत. यामध्ये संपुर्ण शरिराची तपासणी व अत्याधुनिक मशिनद्वारे मोफत ईसीजी काढण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास पुढील उपचाराकरिता रूग्णांना हॉस्पिटलमार्फत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या शिबीराकरिता तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शन लाभणार असून औषधेही मोफत देणार येणार आहेत. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला आयोजकांच्यामार्फत आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्षेत्रातील गरजुंनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

रविवार (दि. २९) रोजी किसन वीर कारखाना कार्यस्थळावर सकाळी १० ते सायं. ४ वाजेपर्यंत हे महाआरोग्य शिबीर असून अधिक माहितीकरिता विकास बाबर (मो. ९०९६५०५२५३), प्रतिक बाबर (मो. ८६०५४३४८८४) रवि जाधव (मो. ८८३०५८६१००), प्रविण शिंदे (मो.८९५६१९०९७६) व रोहित शिंदे (मो. ८१८०९६९७७९) संपर्क साधण्याचे आवाहनही किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे व कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!