Tue, Mar 3, 2026
क्रीडा

शानभाग विद्यालयाच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत विशेष यश. यशस्वी खेळाडूंची झोनल स्पर्धेसाठी निवड

शानभाग विद्यालयाच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत विशेष यश. यशस्वी खेळाडूंची झोनल स्पर्धेसाठी निवड
Ashok Ithape
  • PublishedOctober 6, 2023
सातारा ..6..येथील शाम सुंदरी चॅरीटेबल अँड रीलिजीयस सोसायटी चे के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सातारा मधील  जलतरणपटूनी विशेष यश मिळविले आहे. नुकत्याच शाहू क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या 2023-2024 च्या जिल्हा शालेय जलतरण निकालाचे विजेते आणि सर्व खेळाडू झोनल चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरले आहेत.
या विजयी कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंमध्ये
– अंडर 14 बॉईज श्रेणी – 1) अर्णव गायकवाड – 200 मीटर फ्री स्टाईल, 200 मीटर बॅक स्ट्रोक आणि 400 मीटर फ्री स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 2) आयुष सोनमळे- 100 मीटर फ्रीस्टाइल आणि 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 3) रुद्र पिंपळेने 400 मीटर फ्रीस्टाईलमध्ये पहिला आणि 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. 4) चैतन्य निकम- 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये द्वितीय क्रमांक.. 14 वर्षांखालील मुलींच्या गटात – 1) सई माने- 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये प्रथम क्रमांक. २) चित्राणी नवले- २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये प्रथम क्रमांक आणि बॅकस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक आणि २०० मीटर मिडले आयएम. 3) आरोही यवतकर- 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये प्रथम क्रमांक. ४) अवनी शिंदे – ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये
द्वितीय क्रमांक.
17 वर्षांखालील मुलांची श्रेणी – 1) ओम कलकुटे- 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक. 2) अभिजीत कस्तुरे – 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे 
१७ वर्षांखालील मुलींच्या श्रेणी – १) शुभाशी शिंदे- ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये प्रथम क्रमांक आणि ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये
द्वितीय क्रमांक..
4×100 मीटर फ्री स्टाईल रिले 14 वर्षांखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक 1) अर्णव गायकवाड 2) रुद्र पिंपळे 3) चैतन्य निकम 4) आयुष सोनमळे. याने मिळवला आहे.
4×100 मीटर फ्री स्टाईल रिले 14 वर्षांखालील मुली मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
यात अवन  शिंदे, आरोही यवतकर, मैत्री मोरे,  चित्राणि नवले यांचा समावेश आहे.या सर्व खेळाडूंना फिरोज मुलाणी आणि रवि नाटेकर सर यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले.
या सर्व खेळाडूंचे  यशाबद्दल के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्वस्त सौ.उषा शानभाग ,संचालिका सौ.आचल घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या  खेळाडूंना   शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!