Mon, Mar 2, 2026
क्राईम न्यूज सातारा जिल्हा

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची हातभट्टी व गोवा बनावट दारु वाहतूकीवर धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची हातभट्टी व गोवा बनावट दारु वाहतूकीवर धडक कारवाई
Ashok Ithape
  • PublishedSeptember 27, 2023

सातारा दि.27 (जिमाका) :

आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विजय सुर्यवंशी व विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क किर्ती शेडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरारी पथक सातारा, फलटण यांच्या संयुक्त पथकाने आज 27 सप्टेंबर रोजी मौजे शिंदेवाडी ता. खंडाळा येथे अवैध हातभट्टी दारुची चोरटी वाहतूक पकडून खंडाळा तालुका व परिसरात हातभट्टी वितरीत करणारा व्यक्ती राहुल जितेंद्र कुंभार रा. नायगांव ता. भोर जि. पुणे याच्या ताब्यातून एक चारचाकी वाहनासह 980 लिटर हातभट्टी दारूसह एकूण 2 लाख 56 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

निरीक्षक, कराड यांच्या पथकासमवेत चिपळून-कराड मार्गावर मौजे गोपाटवाडी ता. पाटण गावाच्या हद्दीत कराडच्या दिशेने चालणारी गोवा बनावट विदेशीदारूची वाहतूक पकडून एक चारचाकी व एक सहाचाकी वाहनासह गोवा बनाबटदारुचा एकूण रुपये 19 लाख 75 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कराड व पाटण तालुका परिसरात गोवा बनावट दारुचा पुरवठा करणारे गोरखनाथ बाबुराव पवार रा. बेलवाडे खुर्द ता. पाटण, प्रदीप कृष्णात सलते रा. सलते पो. बीबी ता. पाटण व दिनेश दगडू कदम रा. वालोपे ता. चिपळूण जि.रत्नागिरी यांच्या विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) 81, 83, 90,103 व 108 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 980 लिटर हातभट्टी दारु, 25 बॉक्स गोवा बनावट दारु, दोन चाकी वाहने, एक सहाचाकी वाहन असा एकूण रुपये 22 लाख 31 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईत निरीक्षक माधव चव्हाण, महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रशांत नागरगोजे सहा दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, सचिन खाडे, जवान सागर आवळे, अजित रसाळ, किरण जंगम, आप्पासो काळे, सुरेश अब्दागिरे, मनिष माने, राजेंद्र आवघडे, आबासोब जानकर, विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे यांनी सहभाग घेतला.

जिल्हयामध्ये बनावट दारू तसेच हातभट्टी दारु, गोवा बनावट दारू तसेच इतर कोणत्याही प्रकारची बनावट निर्मिती विक्री वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ राज्य उतपादन शुल्क कार्यालयास देण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, किर्ती शेडगे यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!