वेळे येथील जिल्हातील प्रथम गोबरधन प्रकल्पास केंद्रीय जल शक्ती विभाग मंत्रालय दिल्ली येथील श्री सुभाश्री परीदा यांची भेट
वाई / प्रतिनिधी : १८ ऑगस्ट
सातारा जिल्हातील ग्रामपंचायत वेळे ता. वाई येथे राबविण्यात आलेला जिल्हातील प्रथम गोबरधन प्रकल्पास केंद्रीय जल शक्ती विभाग मंत्रालय दिल्ली येथील श्री सुभाश्री परीदा यांनी भेट दिली.
स्वच्छ मिशन अंतर्गत सातारा जिल्हा मध्ये वाई तालुक्यातील वेळे या ग्रामपंचायती मध्ये जिल्हातील पहिला नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पावर गावातील कुटुंब व हॉटेल व्यावसायिक यांच्या कडे निर्माण ओला कचरा ग्रामपंचायती मार्फत गोळा केला जातो व उभारण्यात आलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून बायोगॅस निर्मिती तयार केली जाते व तयार झालेला गॅस हा शाळा व अंगणवाडी यांना पुरविण्यात येतो त्यावर शाळा व अंगणवाडीतील विध्यार्थी यांचा आहार बनविला जातो.
या बाबत श्री. शुभाश्री परीदा यांनी सदर प्रकल्प राज्यातील इतर जिल्हातील ग्रामपंचायती यांना आदर्श ठरणारा प्रकल्प असे संबोधित केले तसेच सदर प्रकल्पाची केंद्र स्तरावर दखल घेण्यात येईल व शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अभियान मध्ये सहभाग नोंदविणे बाबत ग्रामस्थ यांना आवाहन केले.गोबरधन प्रकल्प शाश्वत स्वरूपात राहणे करीता उपाययोजना करणेत यावेत असे सूचित केले.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. रवींद्र सोनावणे, सरपंच रफिक शेख, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखा अभियंता ग्रापापु अशोक कोकरे, तालुका समन्वयक रोहित जाधव, मनोज खेडकर, ग्रामसेवक हिंदुराव डेरे, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ व संस्था प्रतिनिधी उपस्थित होते













