महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर शाखेने 42 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा सुमारे 211 किलो गांजा केला जप्त
17 SEP 2023 : Mumbai
ट्रॉलीची सखोल तपासणी केली. त्यावेळी अधिकार्यांना ट्रॉलीच्या तळाशी खास तयार केलेला कप्पा आढळला. या कप्प्यात 100 पॅकेजेसमध्ये तब्बल 211 किलोग्रॅम गांजा लपवून ठेवण्यात आला होता, ज्याची अंदाजे किंमत 42.2 लाख रुपये आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांच्या दक्ष पथकाने या वाहनातून प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींना तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही व्यक्तींना अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात पुढील तपास सध्या सुरू असून या बेकायदेशीर गांजाचे मूळ आणि इच्छित गंतव्यस्थानाचा तपास करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी काम करत आहेत.
अंमली पदार्थ तस्करीच्या म्होरक्याला अटक
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या(डीआरआय) अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यामधील म्होरक्या असलेल्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करून अंमली पदार्थ तस्करीच्या विरोधातील लढ्यात मोठे यश मिळवले आहे.
डीआरआयने केलेल्या अनेक कारवायांच्या मालिकेच्या पाठबळावर ही मोहीम राबवण्यात आली. याची सुरुवात 28 जुलै 2023 रोजी झाली ज्या दिवशी एका कुरियर टर्मिनलवर 500 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे महाराष्ट्रात मुंबईजवळ असलेल्या नालासोपारा येथे अतिशय नियोजनबद्ध आणि नियंत्रित पद्धतीने राबवलेल्या मोहिमेत दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. अटकेनंतर या दोघांच्या चौकशीतून आणि डिजिटल उपकरणांच्या न्यायवैद्यक विश्लेषणातून डीआरआयच्या अधिकाऱ्यांना नवी दिल्लीतून या अंमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्या म्होरक्याची ओळख पटवता आली.
अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नांतून आणि बारीक देखरेखीद्वारे डीआरआय अधिकाऱ्यांना या आरोपीचे निश्चित स्थान अतिशय अचूकपणे ओळखता आले. अतिशय काळजीपूर्वक मोहीम राबवून डीआरआयच्या पथकाने या सूत्रधाराला दिल्लीच्या उत्तम नगर भागातून ताब्यात घेतले. त्याला अटक केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला आणण्यात आले आणि 16 सप्टेंबर 2023 रोजी न्यायालयासमोर सादर करण्यात आले. हा आरोपी आता डीआरआयच्या कोठडीत असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.













