बीव्हीजी इंडिया लिमिटेड च्या बीव्हीजी हेरिटेज वॉक या सामाजिक उपक्रमाविषयी आपण अवगत आहात का ?
वारसा पर्यटनाला चालना मिळावी व पुणे शहरातील विविध नामांकित संस्था, संशोधन संस्था, संग्रहालये, पुरातन मंदिरे व धार्मिक स्थळे, महापुरुषांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या विविध वास्तू या विषयी नवीन पिढीला माहितीने अद्ययावत करावे या उदात्त हेतूने बीव्हीजी चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री हणमंतराव गायकवाड यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या हेरिटेज वॉक मध्ये आतापर्यंत २९ वारसा स्थळांना भेट पूर्ण झाली आहे. १९ फेब्रु.,श्री शिवजयंती २०२३ ते १९ फेब्रु, श्री शिवजयंती २०२४ पर्यंत नियमितपणे चालणाऱ्या या उपक्रमात आतापर्यंत हजारो पुणेकरांनी व वारसा प्रेमींनी सहभाग नोंदवला आहे.
ज्या वारसा प्रेमींना, प्रत्येक वॉकला प्रत्यक्ष येता येत नाही, अशांसाठी बीव्हीजी ने संकेतस्थळाची निर्मिती देखील केली आहे. आपणही https://www.bvggroup.biz/pune या संकेतस्थळास भेट देऊन गेल्या २९ वॉक मधील विविध फोटो, व्हिडीओ व त्या वॉक विषयी थोडक्यात मजकुर या संकेतस्थळावर वाचू शकता. तसेच देश विदेशातील आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करुन त्यांच्या पुणे परिसराविषयीच्या ज्ञानात भर घालू शकता.
पुण्याचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या व कुतुहल असणाऱ्या सर्वांनी भविष्यातील वॉकमध्ये सामील व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे!
आतापर्यंत झालेले सर्व वॉक https://www.bvggroup.biz/pune येथे पाहता येतील.
—————
बीव्हीजी हेरिटेज वॉक च्या अधिक माहितीसाठी कृपया https://wa.me/918055767611 वर Hi पाठवून BVG हेरिटेज वॉक ग्रुप-2 जॉइन करावा.
—————
संयोजन सहाय्य – क्लब हेरिटेज, पुणे
नॉलेज पार्टनर – एच व्ही देसाई महाविद्यालय – इतिहास विभाग, पुणे
मीडिया पार्टनर – महाराष्ट्र टाईम्स, पुणे













