Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

सातारा जिल्हा सामाजिक

डॉ.आ.ह.साळुंखे यांचा रविवारी साताऱ्यात ग्रंथतुला सोहळा

डॉ.आ.ह.साळुंखे यांचा रविवारी साताऱ्यात ग्रंथतुला सोहळा
Ashok Ithape
  • PublishedSeptember 8, 2023

साधना साहित्यिक व सांस्कृतिक मंचतर्फे ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजन

सातारा, दि. ८ सातारा / प्रतिनिधी  :

जागतिक कीर्तीचे ख्यातनाम साहित्यिक प्राच्यविद्यापंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांची ग्रंथतुला व ग्रंथ वितरण सोहळा रविवार, दि. १० सप्टेंबर रोजी सातारा येथे होणार आहे. यादरम्यान भारतीय संंस्कृतीचे उत्खनन करून खरा इतिहास – संस्कृती ज्या ग्रंथाच्या माध्यमातून पुढे आली, त्या डॉ. आ. ह साळुंखे लिखित ग्रंथांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. साधना साहित्यिक व सांस्कृतिक मंच सातारा, यांनी हा आगळा वेगळा सोहळा आयोजित केला असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष व कवी, गझलकार वसंत शिंदे यांनी दिली.

याबाबतच्या प्रसिध्दीपत्रकातील माहितीनुसार, भारतीय समाजाला आपल्या लेखणीच्या आणि वाणीच्या माध्यमातून सामाजिक, सांंस्कृतिक दिशा देण्याचे मूलभूत स्वरुपाचे कार्य डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आयुष्यभर केले आहे. त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम होत आहेत.

डॉ. आ. ह. साळुंखे यांची जी कर्मभूमी आहे, त्या साताऱ्यात शानदार सोहळा व्हावा आणि ग्रंथाचे भव्य स्वरुपात वितरण करावे हा उद्देश ठेवून हा सोहळा होत आहे. अभिनेते सयाजी शिंदे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संभाजीराव पाटणे भूषविणार आहेत.

या सोहळ्यात डॉ. आ. ह. साळुंखे यांचे विचार ऐकण्याची संधी सातारकरांना मिळणार आहे. हा कार्यक्रम  कन्या शाळेच्या पाठीमागील दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात शनिवार पेठेत सकाळी ११ वाजता होणार असून जास्तीतजास्त नागरिक व ग्रंथप्रेमींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन कवी वसंत शिंदे तसेच साधना मंच व आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!