Mon, Mar 2, 2026
क्राईम न्यूज स्थानिक बातम्या

रस्त्याच्या वादातून ये जा करण्यास मज्जाव करून कुटुंबाला टाकले वाळीत

रस्त्याच्या वादातून ये जा करण्यास मज्जाव करून कुटुंबाला टाकले वाळीत
Ashok Ithape
  • PublishedAugust 31, 2023

वडाचे म्हसवे (जावली) येथील घटना : प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल संताप

पाचवड प्रतिनिधी : म्हसवे ता.जावली येथील सावंत कुटुंबियांना अश्लील भाषेत शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी मेढा पोलिस स्टेशनमध्ये 19 जणांवर झाला गुन्हा दाखल.

याबाबत फिर्यादी कडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी तरुणी सध्या शिक्षण घेत असून ती योगेश सावंत व इतर सहकारी यांनी धमकी दिल्यामुळे तिच्या बहीणीकडे वास्तव्यास आहे.  फिर्यादी तरुणीचे आई वडील म्हसवे (वडाचे) येथे वास्तव्यास आहेत.  फिर्यादीची म्हसवे येथे वडीलोपार्जित दोन घरे आहेत.त्यामध्ये वडिलांनी बांधलेले घर आणि त्यापुढे दोनशे फुट अंतरावर जुने घर आहे.1998 साली फिर्यादी तरुणीचे वडील व गावातील इतर ग्रामस्थ यांचे संमतीने घराकडे जाणे येणेसाठी पाऊल वाट ठेवलेली होती.

त्या रस्त्याने फिर्यादी तरुणी व तिच्या घरातील इतर कुटुंबीय ये जा करत आहेत.  त्यानंतर सदर पाऊल वाटेमध्ये फिर्यादीच्या वडिलांची संमती न घेता म्हसवे ग्रामस्थांनी खोटे दस्तएवज सादर करून सदर पाऊल वाटेचे ठिकाणी सुमारे वीस फुट रुंदीचा रस्ता शासनाकडून मंजूर करून घेऊन त्याठिकाणी फिर्यादी यांच्या घरापर्यंत दहा फुट रुंदीचा रस्ता करून घेतला आहे. त्यामुळे सदर रस्ता हा फिर्यादी तरुणीच्या वडिलोपार्जित घरापर्यंत सरळ तसाच पुढे व्हावा.या करिता फिर्यादी तरुणीने प्रथम मा.तहसिलदार सो.मेढा यांचेकडे केस दाखल केली. त्याचा निकाल लागला असून ते प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.सदर रस्त्याचे कामात भ्रष्टाचार केल्याचे फिर्यादी तरुणीने उघड केल्याने परिसरातील ग्रामस्थ फिर्यादीवर चिडून आहेत.

दिनांक 24 आँगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजनेच्या दरम्यान फिर्यादी तरुणी आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी म्हसवे येथील सावंत आळी येथुन निघाली असताना सुरज रामदास सावंत यांचे घराजवळ फिर्यादी तरुणी आली असता गावातील 1.निर्मला रामदास सावंत 2.रामदास विष्णु सावंत 3.सर्जेराव विष्णु सावंत 4.योगेश बाबुराव सावंत 5.शीतल योगेश सावंत 6.शर्मिला बाळासों सावंत 7.बाळासो विष्णु सावंत 8.रंजना सर्जेराव सावंत 9.विमल शंकर सावंत 10.शालन मारुती सावंत 11.मारुती नाना सावंत 12.अशोक नाना सावंत 13.मंगल अशोक सावंत 14.फुलाबाई धनाजी सावंत 15.गोरक्ष धनाजी सावंत 16.किरण शिवाजी सावंत 17.इंदुबाई शिवाजी सावंत 18.सुरज रामदास सावंत 19.पुनम नवनाथ सावंत,सर्व रा.म्हसवे ता.जावली जि. सातारा.  यांनी फिर्यादी तरुणीने भ्रष्टाचार उघड केल्याचा व जिल्हा न्यायालयात दावा दाखल केल्याचा राग मनात धरून फिर्यादी तरुणीस सदर रस्त्याने ये-जा करायचे नाही,असे म्हणत फिर्यादी व तिच्या आई वडिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी मेढा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर : गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई का..?

जावली तालुक्यात कुडाळ पोलिस चौकी,करहर पोलिस चौकी असताना पिडीतांना मेढा पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यास का जावे लागते.सदर पिडीत तरूणीला राज्याचे मुख्यमंञी साहेब,पोलिस महानिरीक्षक,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधिक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी,सहाय्यक पोलिसनिरीक्षक,तहसीलदार,गटविकासअधिकारी,ग्रामसेवक,पोलिस पाटील यांच्या कडे गुन्हा दाखल करण्यासाठी पिडीतेला जावे लागले.जावली तालुक्यात पिडीतेला न्यायासाठी वरीष्ठ अधिकारी यांची दारे का ठोकवावी लागली.याचे आत्मपरीक्षण संबंधित प्रशासनाने,जिल्हा पोलिस दलाने करावे अशी मागणी पिडीत कुटूंबासहीत संतप्त नागरीकांमधून केली जात आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!