Thu, Jan 15, 2026
देश विदेश पर्यावरण

लेहमध्ये सुरु होणार प्रायोगिक तत्वावरील शहरांतर्गत धावणाऱ्या हायड्रोजन बसेस

लेहमध्ये सुरु होणार प्रायोगिक तत्वावरील शहरांतर्गत धावणाऱ्या हायड्रोजन बसेस
Ashok Ithape
  • PublishedAugust 19, 2023

१८ ऑगस्ट, मुंबई : लडाखमध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने, राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ (एनटीपीसी) हायड्रोजन फ्युएलिंग स्टेशन,सौर संयंत्राची स्थापना करत आहे आणि लेहमध्ये शहरांतर्गत मार्गांवर चालवण्यासाठी पाच फ्युएल सेल बसेस  पुरवत आहे.

क्षेत्रीय चाचण्या, रस्त्यावर चालवण्यास योग्यतेच्या चाचण्या आणि इतर वैधानिक प्रक्रियांच्या 3 महिन्यांच्या प्रक्रियेचा भाग म्हणून पहिली हायड्रोजन बस 17 ऑगस्ट, 2023 रोजी लेहला पोहोचली. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर धावणारी ही हायड्रोजन बस ही  भारतातील  पहिलीच बस आहे.

नवीकरणीय ऊर्जा पुरवण्यासाठी 1.7 मेगावॅटच्या समर्पित सौर प्रकल्पासह पहिलाच अशा प्रकारचा हरित हायड्रोजन वाहतूक प्रकल्प 11,562 फूट उंचीवर स्थापित करण्यात आला आहे या. इंधन सेल बसेस विरळ वातावरणात शून्याखालील  तापमानात कार्य करण्यासाठी डिझाइन केल्या असून त्या  अधिक उंचीवरच्या ठिकाणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहेत, हे  या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.

2032 पर्यंत 60 गिगावॅट नवीकरणीय  ऊर्जा क्षमता साध्य करण्यासाठी एनटीपीसी वचनबद्ध आहे आणि हरित  हायड्रोजन तंत्रज्ञान  आणि ऊर्जा साठवण क्षेत्रामधील प्रमुख कंपनी आहे.  हायड्रोजन मिश्रण , कार्बन उत्सर्जन कमी करणे ,इलेक्ट्रीक  बसेस आणि स्मार्ट एनटीपीसी टाऊनशिप यांसारख्या कार्बनमुक्तीच्या दिशेने ही कंपनी अनेक उपक्रम हाती घेत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!