Fri, Apr 17, 2026
क्राईम न्यूज

पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सीबीआयकडून सीजीएसटीच्या एका अधीक्षकाला अटक, तपासादरम्यान सुमारे 42.70 लाख रुपये केले हस्तगत

पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सीबीआयकडून सीजीएसटीच्या एका अधीक्षकाला अटक, तपासादरम्यान सुमारे 42.70 लाख रुपये केले हस्तगत
Ashok Ithape
  • PublishedAugust 19, 2023

१८ ऑगस्ट, मुंबई : मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) एका अधीक्षकाला तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांची लाच मागितल्या आणि स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.

मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) या अधीक्षकाविरोधात आलेल्या तक्रारीवरून सीबीआयने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीच्या प्रलंबित जीएसटी (GST) प्रकरणात तडजोड करण्यासाठी या अधीक्षकाने कंपनीकडे पहिल्यांदा 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र या प्रकरणी 15 लाख रुपये लाच देण्याचे संगनमताने निश्चित करण्यात आले. तक्रारदाराकडून ठरलेल्या एकूण रकमेपैकी 5 लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारताना सीबीआयने आरोपीला सापळा रचून रंगेहात पकडले.

आरोपीच्या मुंबई आणि गाझियाबाद येथील कार्यालयांची आणि घरांची झडती घेतली असता त्याच्याकडून 42.70 लाख (अंदाजे) रुपयांची रक्कम आणि जंगम/स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर गैरव्यवहारांचे दस्तऐवज हस्तगत करण्यात आले.

अटक केलेल्या आरोपीला आज मुंबईतल्या सीबीआय प्रकरणांसाठी नियुक्त विशेष न्यायाधीशांसमोर  हजर केले असता त्याला 21.08.2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

स्रोत: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (सीबीआय)

(माहिती विभाग)

5-बी, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड

नवी दिल्ली-110003

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!