Thu, Jan 15, 2026
प्रशासन

सार्वजनिक गणेशत्सव मंडळांनी वर्गणी, देगणी जमा करण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्याचे आवाहन

सार्वजनिक गणेशत्सव मंडळांनी वर्गणी, देगणी जमा करण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्याचे आवाहन
Ashok Ithape
  • PublishedAugust 18, 2023

सातारा दि.18 (जिमाका) : मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 41 (क) नुसार धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास सहायक धर्मादाय आयुक्त, सातारा यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकार आहे. परवानगी शिवाय सार्वजनिक उपक्रमास निधी जमा करणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा आहे, असे आढळल्यास कलम 66 व 67 नुसार फौजदारी कारवाईची तरतूद आहे. याची सातारा जिल्ह्यातील सर्व गणेशत्सव मंडळानी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाकय धर्मादाय आयुक्त  सी.एम. ढबाले यांनी केले आहे.

            गणेशत्सव परवानगीचे आवश्यक अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या www.charity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहे. 2023 सालातील तात्पुरत्या स्वरुपातील परवानगी देण्याचे काम दि. 25 ऑगस्ट 2023 पासून कार्यालयात सुरु करण्यात येणार आहे.  संस्था नोंदणी अधिनियम, 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 अन्वये नोंद असलेल्या व ज्यांच्या उद्देशामध्ये गणेश उत्सव साजरा करणे असा उल्लेख असणाऱ्या संस्थांना अशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेच तात्पुरत्या स्वरुपातील परवानगीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे नवीन परवानगीसाठी अर्ज करतेवेळी त्या त्या क्षेत्रातल नगरसेवक, ग्रामपंचायतीकडील त्यांचे या ठिकाणी गणेशत्सव साजरा करण्यास अनुमती असल्याचे संमती पत्रक सादर करणे आवश्यक आहे.  सन 2023 मधील सार्वजनिक गणेशत्सवासाठी निधी गोळा करण्यासाठी परवानगीचे देण्याचे काम   19 सप्टेंबर अखेर चालू राहणार आहे.

            देगणी दारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगीची प्रत पाहून खात्री करुन देणगी, वर्गणी बाबत निर्णय घ्यावा. तसेच सर्व गणेशत्सव मंडळाच्या सबंधीत पदाधिकाऱ्यांनी मागणी प्रमाणे देणगी, वर्गणी स्वीकारणे पूर्वी परवाना दाखविण्याची व देणगी, वर्गणी मिळालेबाबतची आवश्यक ती पावती देण्याची खबरदारी घ्यावी, असेही आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती ढबले यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!