Fri, Nov 27, 2026
सातारा जिल्हा

आजची लहान मुलेच उद्याचे जबाबदार नागरिक – खासदार श्री. छ.उदयनराजे भोसले

आजची लहान मुलेच उद्याचे जबाबदार नागरिक – खासदार श्री. छ.उदयनराजे भोसले
Ashok Ithape
  • PublishedNovember 26, 2026

शहिदांच्या सन्मानार्थ साताऱ्यात भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ अॅरोबॅटिक टीमचा नेत्रदिपक एअर शो 

सातारा दि.२६ – देशाच्या आणि आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी ज्या वीर जवानांनी आपले प्राण वेचले, अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ व सन्मानार्थ या एयर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यातील कार्यरत जवानांच्या कार्याचा गौरव करत, भावी पिढीमध्ये करिअरची योग्य दिशा आणि समाजसेवेची भावना रुजवण्याचा संकल्प निर्माण होईल. आजची लहान मुलेच उद्याचे जबाबदार नागरिक बनणार आहेत, असे प्रतिपादन खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

सातारच्या धर्तीवरुन डोळ्याचे पारणे फेडणारा भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमचा नेत्रदीपक एअर शो पार पडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, भारतीय हवाई दलाचे स्क्वार्डन लिडर एडवर्ड प्रिन्स, सैनिक स्कुल साताराचे प्राचार्य कॅ. रामनाथन आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार श्री. भोसले म्हणाले, शहीद जवानांचे बलिदान प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी जिवंत राहायला हवे. शहीद झालेल्या व कार्यरत असणाऱ्या भारतीय जवानांमुळे आज आपण सर्वजण सुखरूप आणि निवांत जीवन जगत आहोत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच २६/११ रोजीच्या मुंबई हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्याच्या स्मरणदिनी या दिवसाची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण वर्गाला विविध करिअर संधींची माहिती व समज मिळेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सैनिक स्कुलच्या फुटबॉल मैदानावर सातारा जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व नागरीकांनी हा विशेष हवाई प्रात्यक्षिक पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी भारतीय हवाई दलाच्या ‘सुर्यकिरण’ या ॲरोबॅटी टीमच्या ९ विमानांनी जमिनीपासून एक हजार फुटांपेक्षा कमी उंचीवरून नेत्रदिपक व डोळ्याची पारणे फेडणारी चित्तथरारक उड्डाणे केली. यावेळी संविधान दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!