Fri, Jun 19, 2026
सामाजिक

कृषी मित्र अरुण आदलिंगे यांना ‘कृष्णातीर’चा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

कृषी मित्र अरुण आदलिंगे यांना ‘कृष्णातीर’चा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
Ashok Ithape
  • PublishedJune 18, 2026

शेती, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील ३२ वर्षांच्या योगदानाचा गौरव; शनिवारी वाई येथे होणार सन्मान

वाई प्रतिनिधी : ग्रामीण पत्रकारितेचा दीपस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साप्ताहिक कृष्णातीरच्या वतीने दिला जाणारा ‘आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ यंदा कृषी मित्र अरुण आदलिंगे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या गरवारे सभागृहात आयोजित समारंभात करण्यात येणार आहे. ॲड. वर्षा देशपांडे, श्रीपाद जाधव आणि सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

अरुण आदलिंगे यांनी शेती, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात गेली ३२ वर्षे सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कृषीविषयक मार्गदर्शनामुळे तसेच सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील अनेकांना लाभ झाला आहे. प्रभावी वक्तृत्व, संघटन कौशल्य आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यापूर्वीही त्यांच्या कार्याची विविध संस्थांनी दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. फलटण येथील जय हिंद फाउंडेशनचा ‘जय हिंद गौरव पुरस्कार’, नाशिक येथील मीडिया एक्झिबिशनचा ‘युवा इनोव्हेटिव्ह कृषी पुरस्कार’, प्रगती प्रकाशन कोल्हापूरचा ‘कृषीभूषण पुरस्कार’, वाई येथील साप्ताहिक जल्लोषचा ‘सन्मित्र पुरस्कार’ तसेच जिल्हा ग्रंथालय संघ, सातारा यांचा ‘महात्मा ज्योतिराव फुले आदर्श ग्रंथ मित्र पुरस्कार’ यांसह विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.

साप्ताहिक कृष्णातीरचा ‘आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल अरुण आदलिंगे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था, शेतकरी व नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

  • लोकमित्र म्हणून निर्माण केली वेगळी ओळख

शेती, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात गेली ३२ वर्षे कार्यरत असलेले अरुण आदलिंगे यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्व, संघटन कौशल्य आणि निस्वार्थ सेवाभावी वृत्तीच्या बळावर समाजात वेगळी छाप निर्माण केली आहे. सकारात्मक कार्याची आवड आणि लोकहिताची तळमळ यामुळे अल्पावधीतच ते सर्वसामान्यांचे ‘लोकमित्र’ बनले आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!